Download App

फडणवीसांच्या ‘चार्टर्ड प्लेन’ पॉलिसीवर भारी पडणार पवारांचा डाव? माळशिरसचा बडा नेता भेटीला

Madha Lok Sabha Constituency : सोलापूर जिल्ह्यातील माढा मतदारसंघ राज्यात चर्चेत (Madha Lok Sabha Constituency) आहे. येथील राजकारण प्रत्येक क्षणाला बदलत आहे. महायुतीने या मतदारसंघात रणजित निंबाळकर यांना उमेदवारी दिल्यानंतर माढ्यातून कोण असा प्रश्न शरद पवारांसमोर होता. मग शरद पवारांनी महादेव जानकरांना हेरलं. त्यांच्याशी चर्चा केली. जानकर महाविकास आघाडीच्या गोटात जाणार याचा अंदाज येताच फडणवीसांनी डाव टाकला. जानकरांना अलगद आपल्याकडे घेत परभणीचं तिकीट घेतलं. त्यानंतर कसलेल्या पवारांनाही मोठा डाव टाकत महायुतीतील नाराज धैर्यशील मोहिते पाटलांच्या हाती तुतारी देत माढ्यातून उमेदवारी दिली. आता यानंतर आणखी एक डाव टाकण्याची तयारी शरद पवार करत आहेत. ज्यांच्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी चार्टर्ड प्लेन पाठवले, तातडीने चर्चा केली, त्यांची नाराजी शांत करण्याचा प्रयत्न केला ते उत्तरमराव जानकर आता शरद पवारांच्या भेटीला निघाले आहेत.

उत्तम जानकर यांनी याआधी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. यामागे कारणेही होती. नाराज असलेले उत्तम जानकर माढ्यात महाविकास आघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा देतील अशी चर्चा होती. त्यामुळे फडणवीसांनी तातडीने चार्टर्ड प्लेन धाडत त्यांना बोलावून घेतले.  त्यांच्याशी चर्चा केली. यानंतर आता ते शरद पवार यांची भेट घेणार आहेत.

Devendra Fadanvis यांनी जाहीर सभेतच दिली गुडन्यूज; जात प्रमाणपत्र वैध ठरताच राणा भावूक

जानकर महायुतीवर नाराज आहेत. माढ्यातून निवडणुकीची तयारी करण्यास सांगितले पण तिकीट काही दिलं नाही. यामुळे कार्यकर्ते नाराज झाले आहेत अशी परिस्थिती दिसून येत आहे. आम्ही शरद पवारांचे मार्गदर्शन घेण्यासाठी आलो आहोत. त्यांच्याशी चर्चा करू. यानंतर 19  एप्रिलला काय तो निर्णय घेऊ, असे जानकर यांनी यावेळी सांगितले.

आता उत्तम जानकर आणि शरद पवार यांच्यात काय चर्चा होणार, या चर्चेनंतर जानकर महायुतीसोबतच राहतील की महाविकास आघाडीच्या धैर्यशील मोहिते पाटील यांना पाठिंबा देतील यावर माढ्यातील निवडणुकीचे भवितव्य बऱ्यापैकी अवलंबून राहणार आहे. त्यामुळे उत्तम जानकर यांना आपल्या गटात घेण्यासाठी शरद पवार गटाककडून विशेष प्रयत्न केले जात आहेत. तर जानकर महायुतीतच राहावेत यासाठी फडणवीसांसह महायुतीतील अन्य नेते अॅक्टिव्ह झाले आहेत.

Madha Loksabha : मोहिते पाटील अन् शरद पवारांची दिलजमाई; प्रविण गायकवाडांनी सांगितलं A To Z

माढ्याचं समीकरण अन् धनगर मतदार

माढा मतदारसंघात धनगर समाजाची लोकसंख्या लक्षणीय आहे. त्यामुशे येथून राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांना पाठिंबा देण्याची तयारी शरद पवारांनी चालवली होती. मात्र त्याआधीच जानकरांना महायुतीने परभणीचं तिकीट दिलं. यामागे फडणवीसांची मोठी भूमिका होती. जानकरांना आपल्याकडे घेत एक सेफ खेळी फडणवीसांनी खेळली. आता उत्तम जानकर यांच्या रुपाने महायुतीचे टेन्शन वाढले आहे. जर उत्तम जानकर यांनी महाविकास आघाडीचे धैर्यशील मोहितेंना पाठिंबा दिला तर महायुतीच्या अडचणी नक्कीच वाढणार आहेत.

follow us

वेब स्टोरीज