Raju Shetti on Sadabhu Khot सांगली : ऊसदरावरून माजी खासदार व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी (Raju Shetti) आणि माजी मंत्री सदाभाऊ खोत (Sadabhu Khot) यांच्यात जोरदार खडाजंगी झाली आहे. ऊस उत्पादकांना पहिली उचल 3 हजार 300 रुपये मिळाली असती. पण शेतकरी नेत्याने कारखानदारांशी सेटलमेंट केल्याचा आरोप सदाभाऊ खोत यांच्यावर केला होता. त्याला आता राजू शेट्टी यांनी चोख उत्तर दिले आहे. मला लुंग्या सुंग्याच्या सर्टिफिकेटची गरज नाही. मी जास्त बोलणार नाही. त्यांना माझे कार्यकर्ते उत्तर देतील, असे राजू शेट्टी यांनी म्हटले आहे.
‘जरांगे पाटलांचं आरक्षण राजकीय दिशेने भरकटतंय’, अमोल मिटकरी स्पष्टच बोलले
राजू शेट्टी म्हणाले, गेल्या वीस वर्षांपासून माझ्यावर असेच आरोप होत आहे. माझ्या प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली. मी एकटा रस्त्यावर होते. त्यावेळी पंधरा ते वीस हजार शेतकरी माझ्या पाठिशी उभे राहिले. हेच माझे सर्टिफिकेट आहे. मला लुंग्या सुंग्याचा सर्टिफिकेटची गरज नाही. त्याला माझे कार्यकर्ते उत्तर देतील माझ्या कार्यकर्त्यांची ताकद त्याच्यापेक्षा मोठी आहे.
त्याचबरोबर त्याला जो पाहिजे तो दर त्याने आंदोलन करून घ्यावा, असा टोलाही त्यांनी यावेळी बोलताना लगावला. राजू शेट्टी हे सांगलीमध्ये ऊस दराबाबत भूमिका मांडण्यासाठी आले असता त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी जिल्हाध्यक्ष महेश खराडे, संदीप राजोबा उपस्थित होते.
सदाभाऊ खोतांचाही गंभीर आरोप
ऊसदराच्या आंदोलनावरून माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनीही राजू शेट्टी यांच्यावर गंभीर आरोप केला. ऊस उत्पादकांना पहिली उचल 3 हजार 300 रुपये मिळाली असती. पण या नेत्याने कारखानदारांशी संगमत करून सेटलमेंट केली. दरात पन्ना, शंभर रुपये तडतोड केली. त्यांनी शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. हे मोठे पाप आहे. ऊसदरासाठी आंदोलन स्वतःचाच अंगावर गुलाल उधळून घेतला असल्याची टीकाही सदाभाऊ खोतांनी केली आहे.