Download App

मनातला मुख्यमंत्री कोण? उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवारांनी एकदाचं सांगूनच टाकलं…

राज्यात आता तीन पक्षांचं सरकार स्थापन झालं आहे, त्यामुळे राजकीय समीकरण आधीपेक्षा खूपच बदलल्याची परिस्थिती आहे. अशा परिस्थितीत जर मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यंत्र्यांना मनातला मुख्यंमंत्री कोण? असा सवाल केल्यास तिन्ही नेत्यांकडून वेगवेगळचं उत्तर मिळेल हेच कोणीही बोल शकतं, पण असं घडलं नाही. एका वृत्तवाहिनीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांची मुलाखत झाली. या मुलाखतीत मनातला मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी अपसुकपणे एकाच व्यक्तीचं नाव घेतल्याने त्यांचं हे विधान चांगलचं चर्चेत आलं आहे.

मंत्रिमंडळ समितीतून विखेंना डावललं; मंत्री विखे पाटील काय म्हणाले?

तुमच्या मनातला मुख्यमंत्री कोण? असा प्रश्न एका पत्रकाराकडून विचारण्यात आला. त्यावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, सध्या जे राज्याचे मुख्यमंत्री आहेत, तेच आमच्या मनातील मुख्यमंत्री आहेत. ते आमच्या मनाच्या बाहेरचे मुख्यमंत्री नाहीत. तेच आमच्या मनातील मुख्यमंत्री असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. प्रश्न विचारल्यानंतर सुरुवातीला फडणवीसांची चांगलीच भंबेरी उडाल्याचं दिसून आलं परंतु राजकारणातला चाणक्य म्हणून ओळख असलेल्या फडणवीसांनी शक्कल लढवत भन्नाट उत्तर दिलं आहे.

रविंद्र महाजनी एकटेच का राहत होते? अखेरच्या क्षणी काय घडले? दीड महिन्यांनंतर गश्मीरने सोडले मौन

देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर अजित पवार यांनीही या प्रकरणी फडणवीसांचीच लाईन रिपीट केल्याचं दिसून आलं. सरकारमध्ये जात असताना आम्हा सगळ्यांना मुख्यमंत्रिपदी एकनाथ शिंदे हेच राहणार असल्याचे सांगण्यात आले होते. त्यानंतरही आम्ही सरकारसोबत गेलो होतो. त्यामुळे साहजिकच एकनाथ शिंदे हेच आमच्याही मनातील मुख्यमंत्री आहेत, असे ते म्हणाले.

‘इंडिया’च्या बैठकीसाठी देशातल्या दिग्गज नेत्यांची मुंबईत मांदियाळी, लालूप्रसाद यादव मुंबईत दाखल

काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीत उभी फुट पडल्यानंतर अजित पवारांसह राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. या संपूर्ण घडामोडीनंतर शिवसेनेसारखाच राष्ट्रवादीचाही वाद निवडणूक आयोगाच्या उंबरठ्यावर पोहचल्याचं पाहायला मिळालं. अजित पवार गटाने पक्षासह चिन्हावरही दावा केल्याने शिवसेनेच्या बंडाचीच पुनरावृत्ती झाल्याचं बोललं जात आहे. अशातच आता अजित पवार यांनी एकनाथ शिंदे याचं मुख्यमंत्री म्हणून नेतृत्व मान्य केल्याच्या विधानाची सर्वत्र चर्चा रंगली आहे.

Asia Cup 2023: उद्यापासून आशिया कपचा थरार, पाकिस्तानसमोर नवख्या टीमचे आव्हान

एकनाथ शिंदे काय म्हणाले?
देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी मनातला मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंचं नाव घेतल्यानंतर अखेर आता मी काय बोलणार? असं विधान करत वेळ मारुन नेल्याचं दिसून आले आहेत.

फडणवीसांचा शरद पवारांवर निशाणा :
शरद पवार यांची एक खासियत आहे. त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन अनेक दंतकथा तयार होत असतात. त्या कथा लोकप्रियही होतात. मग काही भक्तांना जगात जे चालतंय ते शरद पवारच चालवत असल्याचं वाटते. मला शरद पवारांविषयी आदर आहे. पण त्यांच्या भक्तांना असे वाटते. त्यामुळे हे जग पवारच चालवतात, असे बोलले जाते.

Tags

follow us