रविंद्र महाजनी एकटेच का राहत होते? अखेरच्या क्षणी काय घडले? दीड महिन्यांनंतर गश्मीरने सोडले मौन

रविंद्र महाजनी एकटेच का राहत होते? अखेरच्या क्षणी काय घडले? दीड महिन्यांनंतर गश्मीरने सोडले मौन

मराठी सिनेसृष्टीतील ‘विनोद खन्ना’ अशी ओळख मिरवणार्‍या रविंद्र महाजनी (Ravindra Mahajani) यांचं गेल्या काही दिवसांपूर्वी पुण्यातील तळेगाव दाभाडे येथे निधन झालं. आंबी गावात राहत्या घरामध्ये मृत्यूच्या तीन दिवसांनंतर घरातून दुर्गंधी आल्यानंतर त्यांचा मृतदेह आढळून आला होता. त्यांच्या निधनाविषयी कोणालाच कल्पना नव्हती. त्यांचा मुलगा आणि अभिनेता गश्मीर महाजनीलाही (Gashmir Mahajani) पोलिसांनीच कळवलं होतं. त्यानंतर तो त्याठिकाणी आला होता.

एका सुप्रसिद्ध अभिनेत्याची अखेरच्या दिवसांमध्ये झालेली दयनीय अवस्था आणि अशा निधनामुळे महाजनी कुटुंबाबद्दल अनेक प्रश्न उपस्थित केले गेले. त्यांच्या कुटुंबियांमध्ये काही मतभेद होते का? रविंद्र महाजनी यांचं सारं कुटुंब मुंबईमध्ये आणि केवळ रविंद्र महाजनी पुण्यात वेगळे का राहत होते? बाप-लेकामध्ये मतभेद होते का? असे सवाल विचारत अनेकांनी गश्मीर महाजनीला (Gashmeer Mahajani) चांगलेच ट्रोल केले होते. (After the death of actor Ravindra Mahajani, Gashmeer Mahajani answered all the questions of the first)

मात्र या सर्व प्रश्नांवर तब्बल दीड महिन्यांनंतर गश्मीरने मौन सोडलं आहे. त्याने मित्र म्हणे या सौमित्र पोटे यांच्या पॉडकास्टमध्ये या सर्व प्रश्नांना सविस्तर उत्तर दिली आहेत.

या पॉडकास्टमध्ये गश्मीरने सर्वप्रथम ट्रोलिंग करणाऱ्या लोकांकडे आपण दुर्लक्ष करत असल्याचे सांगत त्याचा आपल्यावर काहीही परिणाम होतं नाही असे स्पष्ट केले. याचे कारण सांगताना तो म्हणाला, जे काही घडलं त्यामागील सत्य परिस्थिती यातील एकालाही माहित नाही. नाण्याची तिसरी बाजू म्हणजे खरी बाजू सांगत गश्मीर म्हणाला, हे जगणं रविंद्र महाजनी यांनी स्वतः निवडलं होतं. ते आज नाही 20 ते 25 वर्षांपासून निवडलं होतं.

मी आणि माझी आई एका बाजूला आणि वडील एका बाजूला असं झालं होतं. हे एकतर्फी नाते होते. आमच्या बाजूने आम्हाला कायमचं वाटायचं की त्यांनी यावं, आमच्यासोबत रहावं पण त्यांना त्यांचे आयुष्य जगायचे होते. त्यांना कधी वाटलं कुटुंबाचा उपभोग घ्यायचा आहे तर ते यायचे, एक-दोन महिने राहायचे आणि कंटाळा आला की मला माझं आयुष्य जगायचं आहे असं सांगून निघून जायचे. माझी आई आयुष्यभर तिच्या नवऱ्याची वाट बघत राहिली.

रविंद्र महाजनी यांचे अखेरचे दिवस हालाखीत गेले असे म्हंटले जाते. पण हालाखीत काहीच झाले नाही. ते स्वतः आर्थिकदृष्टा सबळ होते. मुंबईला त्यांचा एक फ्लॅट होता. जो माझ्या आणि आईच्या नावावर होता. पुण्यातील घर आईच्या नावावर होते. मुंबईतील घर त्यांना विकायचे होते, तर आईने एका मिनिटात त्यांना सह्या दिल्या, त्याचे पैसेही त्यांनी स्वतःकडे ठेवले होते.

त्यांना केअर टेकर किंवा स्वयंपाक बनविण्यासाठी कोणी का नव्हते, असा प्रश्न विचारला जातो. पण मागील 20 ते 25 वर्षांपासून त्यांनी कधीच दुसऱ्या बाईच्या हातचं जेवण जेवले नाहीत. ते स्वतःचे जेवण स्वतः बनवायचे. ते इथे म्हणजे आमच्यासोबत राहायला आले तरी भाकरी, भाजी आणि डाळ असं स्वतःचं जेवण ते स्वतः बनवायचे. त्यांना कोणाच्याच हातचं आवडायचं नाही. इथे बेडरुममध्येही कधी त्यांनी कोणाला साफसफाईसाठी फिरकू दिले नाही. ते स्वतः सगळ्या गोष्टी करायचे असा खुलासा गश्मीर याने केला.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube