Download App

… अन् राज्यात महिला आरक्षण बिल पास; अजित पवारांनी सांगितला शरद पवारांचा ‘तो’ किस्सा

Ajit Pawar On Sharad Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पुण्यातील बिबवेवाडी येथे अण्णाभाऊ साठे सभागृहात राष्ट्र प्रथम प्रतिष्ठान

Ajit Pawar On Sharad Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पुण्यातील बिबवेवाडी येथे अण्णाभाऊ साठे सभागृहात राष्ट्र प्रथम प्रतिष्ठान व यशवंत क्लासेसच्या वतीनं आयोजित “मातृ नाम प्रथम – शपथ ग्रहण 2025” या कार्यक्रमाला हजेरी लावली. या कार्यक्रमात बोलताना त्यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांनी कसं महिला आरक्षण (Women Reservation) सभागृहात पास करुन घेतला याबाबतचा किस्सा सांगितला.

या कार्यक्रमात बोलताना अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले की, महिलाना राजकारणात 33 टक्के आरक्षण आपण दिलं आहे. जर स्त्री चूल आणि मूल घर संभाळू शकते ती स्त्री गाव , नगरपरिषद देखील संभाळू शकते असा विश्वास आम्हाला आहे म्हणून राजकारणात हे आरक्षण आणले आहे. शरद पवार साहेब मुख्यमंत्री होते त्यावेळेस आरक्षणाचे बिल आणलं होतं. पवार साहेबांनी सांगितलं होतं की हे बिल मंजूर झाल्याशिवाय सभागृहाचे कामकाज सुरू राहील मला आठवत आहे की सभागृह चार वाजेपर्यंत चालवलं आणि महिला आरक्षणाचे बिल पास करून घेतला.

साहेबांनी ठणकावून सांगितलं की आज कितीही उशीर झाला तरी चालेल पण आज महाराष्ट्रात महिला आरक्षणाचे बिल मला आणायचा आहे आणि हे बिल साहेब मुख्यमंत्री असताना पास झाले असं अजित पवार म्हणाले.

तर या कार्यक्रमात बोलताना अजित पवार पुढे म्हणाले की, आज मुली सगळीकडे पुढ आहेत. मुली फक्त अभ्यासातच लक्ष देतात त्या मुलांसारखं इकडे तिकडे लक्ष देत नाहीत. त्याच्यामुळे ज्या देशात महिलांना सन्मान दिला जातो ती देश पुढे आहेत जिथ महिलांना सन्मानला जात नाही तो देश मागासलेला असतो. मुलींना पूर्वी शिकण्याचा अधिकार नव्हता त्यावेळी याच पुण्यात महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी मुलींची पहिली शाळा सुरू केली.

मुलींची शिक्षणाची सोय केली आणि तिथून सुरू झालेला प्रवास इथपर्यंत पोहोचला आहे. आता भिडे वाडा सरकारने ताब्यात घेतला आहे. तिथ पहिली मुलींची शाळा सुरू झाली होती तिथं काम आता सुरू केलं आहे.

पहलगाममध्ये अतिरेक्यांनी अनेकांना मारलं पण याचा बदला घेतला पाहिजे आणि मास्टरमाईंड शोधून त्यांना संपवलं पाहिजे अशी भावना आपली होती आणि त्यावेळी भारत पाकिस्तानमध्ये युद्ध झालं आपण सगळेजण देशाचे मनोधैर्य वाढवण्याचे काम करत होतो. त्याही वेळी दोन महिलांनी मीडिया समोर येऊन देशाला माहिती दिली पण काही लोकांनी त्यांच्यावर टीका केली हे चुकीच आहे आम्हाला याचं वाईट वाटतं. असेही अजित पवार म्हणाले.

“मी दिल्लीतल्याच घरात बसलोय”, राऊतांनी सांगितला अटकेपूर्वी शहांना केलेल्या ‘मीड नाईट’ कॉलचा घटनाक्रम

रोज आम्ही नाटक करतो : अजित पवार 

तर संकर्षण म्हणाला की दादा मी एक नवीन नाटक काढल आहे त्याचा पन्नासावा प्रयोग बघायला या मी त्याला म्हटलं की आता रोज आम्ही नाटक करत असतो मला काय नाटक दाखवणार? आम्हालाही वाटतं नाटकाला जावं पण कामातून वेळ भेटत नाही. आमचे सहकारी नेहमी काहीतरी घेऊन येतात हे करा ते करा अरे सारखं काय करा तुझं कर्तुत्व असेल तर मी करेन सारखं पुढ करतात काम मात्र करत नाहीत जाऊदे आता जास्त नाही बोलणार निवडणूक आहेत असा मिश्किल टोला देखील अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना लावला.

follow us