“मी दिल्लीतल्याच घरात बसलोय”; राऊतांनी सांगितलं शाहंना केलेल्या ‘मीड नाईट’ कॉलचं रेकॉर्डिंग

“मी दिल्लीतल्याच घरात बसलोय”; राऊतांनी सांगितलं शाहंना केलेल्या ‘मीड नाईट’ कॉलचं रेकॉर्डिंग

Sanjay Raut Press Conference : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या ‘नरकातला स्वर्ग’ या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे. पुस्तक प्रकाशित होण्याआधीच त्यातील काही मजकूर माध्यमांत आला. याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. आता खासदार संजय राऊत यांनीच यावर भाष्य केलं आहे. ईडीने अटक करण्याआधी आपण केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना (Amit Shah) फोन केला होता. तसेच एकनाथ शिंदे यांनीही फोन केल्याचा दावा राऊत यांनी केला.

संजय राऊत यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पुस्तकातील मजकूराविषयी माहिती दिली. संजय राऊत म्हणाले, अटक होण्याआधी मी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना फोन केला होता. ईडीने माझे मित्रांवरही धाडी टाकल्या होत्या. मी राजकारणी आहे मी सहन करील पण माझ्यामुळे माझ्या मित्रांना त्रास झाला या गोष्टीचं मला वाईट वाटलं.

रात्री अकरा वाजता मी शाहांना फोम केला होता. ते कामात होते. नंतर चार मिनिटांनी त्यांचा फोन आला. ते नेहमीप्रमाणे म्हणाले बोलो संजयभाई.. मी म्हणालो माझ्या मित्रांवर धाडी टाकल्या जात आहेत. हे सगळं तुमच्या मंजुरीने होत आहे. जर मला अटक करायचीच आहे तर मी दिल्लीच्या घरी आहे नौटंकी बंद करा. त्यावर शाह म्हणाले, मला काही माहिती नाही.

संजय राऊत हा महालोफर माणूस, गुलाबराव पाटलांची सडकून टीका

मी म्हणालो तुम्ही केंद्रीय गृहमंत्री आहात तुम्हाला हे माहित असणार. त्यानंतर आशिष शेलार यांचा फोन आला ते म्हणाले अमित शाह यांना फोन केला मी त्यांना सांगितलं होतं. संजय मिश्रा हे मोदी यांना ब्रिफींग करत होते देशातला सगळ्यात मोठा घोटाळा आहे. अटक होण्याआधी एकनाथ शिंदे यांचा मला फोन आला होता. शिंदे म्हणाले कीं मी वरती बोलू का? अमित शाह यांना बोलू का? मी म्हणालो काही गरज नाही. तुम्ही वरती बोलले तरी तुमच्या पक्षात येणार नाही असे मी एकनाथ शिंदे यांनी निक्षून सांगितल्याचे संजय राऊत यांनी म्हणाले.

अमित शाहांमुळेच शिवसेना भाजपात कटुता

अमित शाह यांच्या मुळे शिवसेना भाजपमध्ये कटुता आली हे मी १०० टक्के सांगतो. आमचे आणि भाजपचे संबंध चांगले होते नरेंद्र मोदी याच्यासोबत चांगले संबंध होते. पण अमित शाह दिल्लीत सक्रिय झाले आणि भाजप आणि शिवसेना नात्यामध्ये कटुता निर्माण झाली. काही भाजप नेत्यांनी अमित शाह यांना सांगितलं सुद्धा तुम्ही असं करू नका. अरुण जेटली अमित शाहांना बोलले महाराष्ट्रामध्ये शिवसेनेसोबत आपले चांगले संबंध आहेत असा करू नका असा दावा खासदार संजय राऊत यांनी केला.

Video : आर्थर रोड तुरुंगाला संजय राऊत ‘नरकातला स्वर्ग’ का म्हणाले?; पाहा लेट्सअपची खास मुलाखत

follow us
  • fb
  • instagram
  • youtube