Buldhana Bus Accident : जन्म आणि मृत्यू या दोन्हींमधील काळामध्ये मनुष्य दररोज घटत जाणारं आयुष्य जगतं असतो. त्यात तो कित्येक स्वप्नांचे मनोरे रचत असतो. कधी ते पूर्ण होतात. कधी होतही नाहीत. मात्र कधी ते स्वप्न पूर्ण होण्याच्या उंबरठ्यावर असतानाचं अनेकांच्या स्वप्नांवर काळ पाणी फिरवतो. तर कधी आपल्या इच्छित स्थळी पोहचत असताना तो आपल्यावर घाला घालतो. त्याचा प्रत्यय आज शनिवारी 1 जुलैला समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघातामध्ये आला. या अपघातामध्ये तब्बल 26 जण अक्षरशः होरपळून दगावले. ( Youngers dreams too burnt with burnt Bus in Buldhana Bus Accident on Samrudhi Highway )
रस्ते अपघाताला कारणीभूत ठरणारं रोड हिप्नॉसिस म्हणजे नेमकं काय? ते कशामुळं होतं? जाणून घ्या.
त्यामध्ये इंजिनिअर झालेला तेजस कॅम्पसमध्ये सिलेक्शन होऊन नोकरीवर रूजू होण्यासाठी निघाला होता. पुण्यातील गंगावणे दाम्पत्य मुलगी सईसह आपल्या मुलाला नागपूरच्या विधी महाविद्यालयात सोडून पुण्याला परतत होते. तर 23 वर्षांचा निखिल कामासाठी पुण्याला जात होता. तर 25 वर्षीय अवंती मेकअप आर्टीस्ट आणि मॉडेलिंग करण्यासाठी पुण्याला निघाली होती. तसेच राधिका खडसे आणि श्रेया वंजारी या दोन जीवलग मैत्रिणींना पुण्यात एमबीए करायचं होत मात्र वाटेतच त्यांचा करूण अंत झाला. असा अनेक तरूणांच्या स्वप्नांचा आणि आयुष्याचा एका रात्रीत अंत झाला.
Samrudhi Highway Accident : जो अपघातात मृत्यू पावतो तो ‘देवेंद्र’वासी होतो; पवारांची बोचरी टीका
वर्ध्यातील तेजस पोकळे या तरूणाने बारावीपर्यंत वर्ध्यातच शिक्षण घेतलं. त्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये शासकीय महाविद्यालयात कॉम्प्युटर इंजिनिअरिंगची पदवी घेत असताना होतकरू असलेल्या तेजसला शेवटच्या वर्षीच कॅम्पस सिलेक्शनमधून पुण्यातील कंपनीमध्ये नोकरी लागली होती. याच पहिल्या नोकरीवर हा तरूण अनेक स्वप्न पूर्ण करण्यासाठी रूजू व्हायला पुण्याला निघाला होता. त्यासाठी तो विदर्भ ट्रॅव्हल्समधून प्रवास करत होता. मात्र त्याच वेळी या बसचा अपघात झाला आणि त्याचा मृत्यू झाला.
देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्ट ‘समृद्धी’वर 900 अपघात; एकनाथ खडसेंचा हल्लाबोल
पुणे जिल्ह्यातील प्राध्यापक कैलास गंगावणे (वय 48 वर्षे ) यांच्या पत्नी कांचन गंगावणे (वय 38 वर्षे) आणि मुलगी सई गंगावणे (वय 20 वर्षे)हे त्यांच्या मुलाला नागपूर येथील विधी महाविद्यालयात प्रवेश मिळाल्याने तेथे सोडून पुण्याला परतत होते. त्याचवेळी त्यांचा हा अपघात झाला. कैलास हे नेहरू पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालयात तब्बल 27 वर्ष प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. त्यांची मुलगी सई गंगावणी हिचे MBBS करण्याचे स्वप्न होते.
ते मूळचे शिरूरचे असून नोकरीच्या निमित्ताने ते आंबेगाव येथील निरगुडसर येथे राहत होते. या कुटुंबाचा संपर्क होऊ शकत नसल्याने या बसचा अपघाताची माहिती मिळताच कैलास यांची मेहुणे अमर काळे यांनी शोध घेतला. तेव्हा त्यांना अशी माहिती मिळाली की, नागपूरहून पुण्याकडे निघालेल्या विदर्भ ट्रॅव्हल्सच्या बसच्या अपघात झालेल्या मृतांच्या यादीमध्ये या तिघांचाही नाव आहे. तसेच त्यांच्या मोबाईलच्या शेवटचे लोकेशन ही हे अपघात स्थळ होतं.
यवतमाळचा 23 वर्षीय निखिल पाथे हा शिक्षण घेत असतानाच पुण्यामध्ये नोकरीसाठी निघाला होता. तो रात्री या ट्रॅव्हल्समध्ये बसला खरा मात्र सकाळी त्याचा फोन लावला असता तो लागलाच नाही. त्याचा भाऊ त्याला पैसे पाठवण्यासाठी संपर्क करत होता. मात्र त्याचवेळी त्याच्या भावाला अनेकांचे या अपघातासंदर्भात फोन आले. त्यांच्या कुटुंबावर मोठा आघात झाला. त्याच्या कुटुंबामध्ये त्याच्या आई वडील निखिल आणि त्याचा भाऊ असेच चौघे जण होते.
Video : अपघातानंतर सर्व यंत्रणा वेळेत पोहोचल्या पण…; बुलढाणा अपघातानंतर मुख्यमंत्र्यांचं मोठं विधान
तसेच या अपघातामध्ये अवंती पोहोनेकर या इंजिनिअर असलेल्या मेकअप आणि मॉडलिंगचा छंद असलेल्या पंचवीस वर्षीय तरुणीचा स्वप्नभंग झाला आहे. अवंती ही मूळची वर्ध्याची तिचे वडील लहानपणीच गेल्याने ती आणि तिची बहीण आणि आई या तिघाचसोबत राहत होत्या. अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केलं. मात्र तिला मेकअप आर्टिस्ट म्हणून करिअर करायचं होतं. म्हणून तिने पूर्ण गाठायचं ठरवलं. मात्र तिचं हे स्वप्न एका रात्रीत भंग झालं आहे.
टायर फुटलाच नाही! 26 जणांचा जीव घेणाऱ्या अपघाताचं खरं कारण RTO अन् महाजनांनी सांगितलं
त्याचबरोबर या अपघातामध्ये दोन जिवलग मैत्रिणींचा शेवटही सोबतच झाला. वर्ध्यामधीलच असलेल्या राधिका खडसे आणि श्रेया वंजारी या जिवलग मैत्रिणी होत्या. त्यांना सोबतच पुण्यामध्ये एमबीएचे शिक्षण घ्यायचं होतं. त्यासाठी त्यांनी पुण्यातील एका कॉलेजमध्ये प्रवेश घेतला होता. सोमवारपासून कॉलेज सुरू होणार असल्याने त्या दोघी देखील वर्ध्यावरून विदर्भ ट्रॅव्हल्सने पुण्यासाठी निघाल्या होत्या. मात्र वाटेतच या ट्रॅव्हल्स अपघात झाला आणि या दोघी जिवलग मैत्रिणींचा शेवटही सोबतच झाला.