Download App

काँग्रेसच्या यादीत ट्विस्ट! यादी जाहीर होताच मोठ्या नेत्याची माघार? मतदारसंघ बदलाची मागणी

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपली उमेदवारी मागे घेण्यात यावी अशी विनंती पक्ष नेतृत्वाला केली आहे.

Congress Candidate Third List : राज्याच्या विधानसभा निवडणुकीत काल दिवसभरात काँग्रेस पक्षाने उमेदवारांच्या याद्या जाहीर केल्या. तिसरी यादी शनिवारी रात्री उशिरा जाहीर करण्यात आली. या यादीत १६ उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली. ही यादी जाहीर झाल्यानंतर काही वेळातच मोठा ट्विस्ट आला आहे. काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपली उमेदवारी मागे घेण्यात यावी अशी विनंती पक्ष नेतृत्वाला केली आहे. त्यांनी या बाबत एक्सवर एक पोस्टही लिहीली आहे. त्यांच्या या भूमिकेची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

काँग्रेसने सचिन सावंत यांना (Sachin Sawant) अंधरे पश्चिमममधून तिकीट दिलं आहे. मात्र या मतदारसंघातून उमेदवारी करण्यास सचिन सावंत इच्छुक नाहीत. त्यांनी याबाबत पक्ष नेतृत्वाला माहिती दिली असून मतदारसंघ बदलण्यात यावा अशी मागणी केली आहे. यादी जाहीर झाल्यानंतर काही तासांनंतरच खुद्द उमेदवारानेच अशी मागणी केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

Congress First list : मोठी बातमी! काँग्रेसच्या 54 उमेदवारांची यादी निश्चित; महत्त्वाची नावं आली समोर

सचिन सावंतांचं ट्विट काय

मी वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघातून पक्षाकडे उमेदवारी मागितली होती. तिथेच लढाव अशी माझी इच्छा होती. परंतु, तो मतदारसंघ शिवसेना उबाठा पक्षाकडे गेला आहे. मी अंधेरी पश्चिम मतदारसंघातून उमेदवारी मागितली नव्हती. तरी पक्षश्रेष्ठींनी माझ्यावर जो विश्वास दाखवला त्याबद्दल मनापासून धन्यवाद. परंतु, मी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पक्षाचे प्रभारी रमेश चेन्निथला यांवना पक्षाने निर्णय बदलावा यासाठी विनंती केली आहे. मी पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे. त्यामुळे पक्षश्रेष्ठी माझ्या विनंतीची सहानुभूतीपूर्वक विचार करतील ही आशा बाळगतो.

आता मी मतदारसंघ बदलून देण्याचा निर्णय हायकमांडवर सोपवला आहे. या ठिकाणी माझ्याऐवजी दुसऱ्या कार्यकर्त्याला संधी मिळावी अशी माझी इच्छा आहे. यामध्ये कोणतीही नाराजी नाही. मी काँग्रेसचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे. केवळ मी जिथून निवडणूक लढण्याची तयारी केली होती तिकडून मला संधी मिळावी एवढीच अपेक्षा आहे, असेही सावंत यांनी स्पष्ट केले.

काँग्रेसच्या यादीत कोण कोण ?

विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून काल तिसरी यादी जाहीर करण्यात आली. या यादीमध्ये काँग्रेसने 16 उमेदवारांची घोषणा करण्यात आली. अंधेरी पश्चिममधून काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. वांद्रे पूर्वमधून आसिफ झकेरिया यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे तर दिग्रसमधून काँग्रेसचे जेष्ठ नेते माणिकराव ठाकरे यांना तिकीट मिळालं आहे. तुळजापूरमधून कुलदीप धीरज कदम-पाटील निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. तर सांगली विधानसभा मतदारसंघातून पृथ्वीराज पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

follow us