Download App

राजकारणात तुम्हाला पोरं होत नाहीत, आम्हाला आणखी पोरं… उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल !

छत्रपती शिवाजी महाराज, फुले यांचा अपमान केल्यानंतर शेपूट घालणारी लाचार गँग, गद्दार गँग गप्प बसून राहिली- Uddhav Thackeray

  • Written By: Last Updated:

Uddhav Thackeray Thane speech : महायुतीचे उमेदवार राजन विचारे (Rajan Vichare) यांच्या प्रचारार्थ उद्धव ठाकरे यांनी ठाण्यात सभा घेतली. या सभेत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी भाजपवर (BJP) जोरदार हल्ला चढविला आहे. भाजपला भाकड पक्ष का म्हणतो तर त्यांना राजकारणात पोरं झाली नाहीत. त्यामुळे ते आमची पोरं पळवतात. आमची पोरं घेऊ गेले तर आम्हाला आणखी पोरं होतील, अशा भाषात ठाकरेंना भाजपावर टीकास्त्र सोडले आहे. तुम्हाला झाडाच्या फांदे, फुले तोडाल परंतू मूळ तोडू शकत नाहीत, असेही ठाकरे म्हणाले.

‘असली नौटंकी खपवून घेणार नाही’ अजित पवारांचा रोहित पवारांवर घणाघात

शिवसेना पक्ष व चिन्ह हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देण्यावरून ठाकरे यांनी माजी राज्यपाल कोश्यारी, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर जोरदार टीका केली. ते म्हणाले, पक्षाचा निर्णय घेण्यासाठी लवादावर लबाड नार्वेकरांना बसविले होते. क्रिकेटसारखी तुमचे दांडके उडविल्यानंतर अंपायर त्याला सिक्सर मारला म्हणतात. कोश्यारी म्हणजे तुमचा दुसरा नोकर होता. त्यांनी राज्यपालपदाचा अपमान केला आहे. छत्रपती शिवाजी महाराज, फुले यांचा अपमान केल्यानंतर शेपूट घालणारी लाचार गँग, गद्दार गँग गप्प बसून राहिली.

“होय, मी बारामतीची लेक, तुमच्यापेक्षा येथे जास्त राहते”; सुप्रिया सुळेंनी अजितदादांना ठणकावलं!

मोदींनी नकळत सर्वोच्च न्यायालयावर दबाव आणला असल्याचा आरोप करताना ठाकरे म्हणाले, तुम्ही सर्वोच्च न्यायालयात दबाव टाकून आमची शिवसेना गद्दारांनी दिली आहे. आता तुम्ही आम्हाला नकली सेना म्हणता. आता आम्ही हातामध्ये मशाल घेतली आहे. आता मशाल तुम्हाला जाळून टाकेल.

महाराष्ट्र तुमची खुर्ची काढून घेईल…

पंतप्रधान पदाची खुर्ची काढून घेण्याची ताकद, धमक महाराष्ट्रामध्ये आहे. महाविकास आघाडीला 48 जागा मिळाल्या पाहिजे. कमळाबाईला महाराष्ट्रात एकही जागा मिळाली नाही तर मोदी सरकारला आपण गाडून टाकू, असे ठाकरे म्हणाले. महाराष्ट्रात चारशेपार सभा घ्या, गल्लीबोळ्यात सभा घ्या पण महाराष्ट्र जिंकून दाखवा, असे चँलेजही ठाकरेंनी भाजपला दिले आहे.

विरोधी उमेदवाराचे डिपॉझिट जप्त करा

राजन विचारे यांना केवळ निवडून देऊ नका..त्यांना इतक्या मताने निवडून दिले पाहिजे की विरोधक उमेदवाराचे डिपॉझिट जप्त करा, असे आवाहन ठाकरे यांनी केले आहे.

https://www.youtube.com/live/evb5A7NuDOc?si=LaCGtow2P1rCq7QB

follow us