Download App

Worli Hit and Run प्रकरणी शिंदेंच्या शिवसेनेचे राजेश शहा ताब्यात तर मुलासह ड्रायव्हरवर गुन्हा दाखल

Varali Hit and Run प्रकरणी शिवसेनेच्या राजेश शहा त्यांना ताब्यात घेतलं. त्यांचा मुलगा आणि ड्रायव्हर या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Worli Hit and Run Case Filed on Son of Shivsena Rajesh Shah : वरळी हिट अॅंड रन ( Warali  Hit and Run) प्रकरणी शिवसेनेच्या (Shivsena) शिंदे गटातील उपनेते राजेश शहा त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. असून त्यांचा मुलगा आणि ड्रायव्हर या दोघांवर गुन्हा दाखल (Case Filed ) करण्यात आला आहे. दरम्यान पुण्यातील पोर्शे कार अपघाताची घटना ताजी असतानाच राज्यात अनेक ठिकाणी अशी प्रकरणं समोर आहेत. त्यामध्ये आता मुंबईतील वरळी या भागामध्ये आणखी एक हिट अॅंड रनचं प्रकरण समोर आलं आहे.

नेमकी घटना काय?

मुंबईतील वरळी या भागामध्ये पहाटे 5:30 वाजता एक कोळी दाम्पत्य मासे आणण्यासाठी बाहेर पडलं होतं. त्यावेळी वरळीतील अॅट्रीया मॉल जवळ त्यांना मासे घेऊन परतत असताना एका फोरव्हिलरने त्यांच्या दुचाकीला मागून धडक दिली. दुचाकीवर मासे मोठ्याप्रमाणात असल्याने गाडीचे नियंत्रण सुटले आणि दोघंही चार चाकी गाडीच्या बोनटवर पडले. वेळीच नवऱ्याने गाडीच्या बोनटवरून बाजूला उडी टाकली.

वैजूचं लग्न रणविजयशी झालं खरं पण ‘माटी से बंधी डोर’ मध्ये येणारे नवा ट्विस्ट!

मात्र महिलेला बाजूला होता आलं नाही. अशातच अपघातामुळे घाबरलेल्या चालकाने गाडी पळवली. त्यात कोळी महिलेला त्याने फरफटत नेले. या अपघातात कार चालक पळून गेला होता. कोळी महिलेला उपचारासाठी नायर रुग्णालयात नेले असता. डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. या प्रकरणी वरळी पोलिसांनी तपासादरम्यान शिवसेनेच्या शिंदे गटातील उपनेते राजेश शहा त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतला असून त्यांचा मुलगा आणि ड्रायव्हर या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

…तर नरेंद्र मोदींचा पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होणे कठीण; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं

वरळी हिट अॅड रन प्रकरणी ताब्यात घेण्यात आलेले शिवसेनेच्या शिंदे गटातील उपनेते राजेश शहा हे पालघरमधील शिवसेनेचे उपनेते आहेत. मात्र वरळी हिट अॅड रन प्रकरणात त्यांचा मुलगा व ड्रायव्हर गाडीत होता. पोलिसांना आरोपी मुलांचाही शोध लागला असून चालक मुलगा व ड्रायव्हर दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.

follow us