Andhra Pradesh Chemical Factory : आंध्र प्रदेशातील (Andhra Pradesh) अनकापल्ले येथील रासायनिक कारखान्यात (Chemical Factory) झालेल्या स्फोटात मृत्यूचा आकडा वाढला आहे. आतापर्यंत या दुर्घटनेमध्ये 15 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. तर 30 हून अधिक जखमी झाले असल्याची माहिती जिल्हाधिकारी विजया कृष्णन (Vijaya Krishnan) यांनी दिली आहे.
त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अनकापल्ले जिल्ह्यातील अच्युथापुरम येथील एसिंटिया ॲडव्हान्स्ड सायन्सेस प्रायव्हेट लिमिटेडमध्ये दुपारी 2:15 वाजता आग लागली होती. या कारखान्यात दोन शिफ्टमध्ये 381 कर्मचारी काम करत असतात.
आज दुपारी जेवणाच्या वेळी हा स्फोट झाला. जेव्हा हा स्फोट झाला तेव्हा कारखान्यात कर्मचाऱ्यांची संख्या कमी होती अशी माहिती जिल्हाधिकारी विजया कृष्णन यांनी दिली. स्फोटाचे कारण विजेशी संबंधित समस्या असू शकते असं देखील ते म्हणाले.
33 जण जखमी
तर या दुर्घटनेमध्ये 33 जण जखमी झाले असल्याची माहिती देखील त्यांनी दिली आहे. सध्या जखमींवर अनकापल्ले आणि अच्युतापुरम येथील विविध रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे.
मोदी सरकारचा मोठा निर्णय, शरद पवारांना मिळणार ‘Z Plus’ सुरक्षा, ‘हे’ आहे कारण
घटनास्थळी अग्निशमन दलाच्या सहा गाड्या बचावकार्यासाठी तैनात करण्यात आल्या आहे तसेच आतापर्यंत कारखान्यातून 13 जणांची सुटका करण्यात आली असल्याची माहिती देखील जिल्हाधिकारी विजया कृष्णन यांनी दिली. मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू (N Chandrababu Naidu) यांनी या दुर्घटनेवर शोक व्यक्त केला आहे तसेच त्यांनी आश्वासन दिले की सरकार मृत कामगारांच्या कुटुंबियांच्या पाठीशी उभे राहील.