Asaduddin Owaisi On Bilawal Bhutto : पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यावरुन हैदराबादचे (Hyderabad ) खासदार असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांनी पुन्हा एकदा पाकिस्तानावर (Pakistan) जोरदार हल्लाबोल करत पाकिस्तान सरकारमध्ये मंत्री असणाऱ्या बिलावल भुट्टोला (Bilawal Bhutto) प्रश्न विचारला आहे. तुमच्या आईला मारणारे दहशतवादी आणि आमच्या आई- बहिणींना मारणारे दहशतवादी नाही का? असा सवाल असदुद्दीन यांनी पाकिस्तान पीपल्स पार्टीचे अध्यक्ष बिलावल भुट्टो यांना विचारला आहे. माध्यमांशी बोलताना खासदार ओवैसी पाकिस्तानावर आक्रमक झाले असल्याचे पाहायला मिळाले.
माध्यमांशी बोलताना खासदार ओवैसी म्हणाले की, बिलावल भुट्टो राजकारणात नवीन आहे आणि त्यांना काहीही माहिती नाही. त्यांना विचारावा लागेल की, त्यांच्या आईची हत्या करणारे जर दहशतवादी असेल तर आमच्या आई आणि बहिंणा मारणारे दहशतवादी नाही का? याबाबत त्यांना विचारावा लागेल असं खासदार ओवैसी म्हणाले. तसेच ज्या व्यक्तीच्या आईची हत्या दहशतवाद्यांनी केली त्या व्यक्तीला दहशतवादाबद्दल काहीच माहिती नाही ही चिंतेची बाब आहे. असं देखील खासदार ओवैसी म्हणाले. पुढे बोलताना खासदार ओवैसी म्हणाले की, पहलगाम हल्ला प्रकरणात भारत सरकार जी भूमिका घेणार त्यासोबत आम्ही असणार आहोत.
रविवारी देखील खासदार ओवैसी यांनी पहलगाम हल्ल्यावरुन पाकिस्तानावर जोरदार टीका केली होती. पाकिस्तान अणुशक्ती असल्याचा दावा करुन निष्पाप लोकांना मारु शकत नाही. मात्र त्यांनी हे लक्षात घेतले पाहिजे की, जर त्यांनी आमच्या लोकांना मारले तर आम्ही देखील गप्प बसणार नाही. पुढे बोलताना असदुद्दीन ओवैसी म्हणाले होते की, जेव्हा तुम्ही लोकांना त्यांचा धर्म विचारून मारता तेव्हा तुम्ही धर्माबद्दल कसे बोलता. तुम्ही इस्लामिक स्टेट दहशतवादी संघटनेसारखे वागला आहात.
जम्मू आणि काश्मीर येथील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 27 पर्यटकांचा मृत्यू झाला होता. या धक्कादायक घटनेनंतर संपूर्ण देशात संतापाची लाट पसरली आहे. देशातील विविध भागात पाकिस्तानचा निषेध करण्यात येत आहे.
माफी मागण्यासाठी शब्द नाही अन्…, विधानसभेत ओमर अब्दुल्ला भावुक
तर दुसरीकडे भारत सरकारने देखील देशात राहणाऱ्या सर्व पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द करण्याची घोषणा केली आहे. याचबरोबर भारताने सिंधू पाणी करार देखील रद्द केला आहे.