Download App

मोठी बातमी! कर्पूरी ठाकूर यांना मरणोत्तर भारतरत्न जाहीर

Bharat Ratna Award 2024 : बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर (Karpuri Thakur) यांना भारतरत्न (Bharat Ratna Award) जाहीर झाला आहे. त्यांना मरणोत्तर भारतरत्न देण्यात येणार आहे. बुधवारी (24 जानेवारी) कर्पूरी ठाकूर यांची जयंती असताना केंद्र सरकारने ही घोषणा केली आहे.

कर्पूरी ठाकूर यांना भारतरत्न देऊन सन्मानित करण्याची मागणी अनेक दिवसांपासून होत होती. मंगळवारी (22 जानेवारी) जेडीयू नेते केसी त्यागी यांनी ठाकूर यांना भारतरत्न देण्याची तसेच त्यांच्या नावाने विद्यापीठ सुरू करण्याची मागणी केली होती.

बाळासाहेबांच्या जयंतीचा काँग्रेसला विसर, भाजपचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

कर्पूरी ठाकूर हे दोन वेळा बिहारचे मुख्यमंत्री आणि एकदा उपमुख्यमंत्री होते. ते बिहारचे पहिले बिगर काँग्रेस मुख्यमंत्री होते. 1952 मध्ये त्यांनी पहिल्यांदा विधानसभा निवडणूक जिंकली. 1967 मध्ये, कर्पूरी ठाकूर, जेव्हा ते उपमुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांनी बिहारमधील इंग्रजीची अट रद्द केली होती.

कर्पूरी ठाकूर हे मागासवर्गीय लोकांच्या राजकारणासाठी ओळखले जात होते. कर्पूरी ठाकूर यांची जन्मशताब्दी 24 जानेवारी रोजी पाटण्यात मोठ्या थाटामाटात साजरी केली जाणार आहे. याबाबत जनता दल युनायटेडने संपूर्ण बिहारमध्ये मोहीम सुरू केली आहे.

‘सत्ता येऊ द्या, तुमच्याच तंगड्या तुमच्या गळ्यात घालतो’; उद्धव ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांना धमकावलंच

जेपी, लोहिया आणि आचार्य नरेंद्र देव यांना आदर्श डोळ्यासमोर ठेवून कर्पुरी ठाकूर यांनी सामाजिक बदलाची सुरुवात केली होती. कर्पूरीपूर्वी समाजवादी चळवळीला केवळ उच्च वर्गाकडूनच पाठिंबा मिळाला होता. यामुळे समाजवादी चळवळ पराभूत झाली होती पण कर्पूरी ठाकूर यांनी संपूर्ण चळवळ लोकांपर्यंत पोहचवली. 1970 मध्ये ते सरकारमध्ये मंत्री झाल्यावर त्यांनी आठवीपर्यंतचे शिक्षण मोफत केले. उर्दूला दुसऱ्या राजभाषेचा दर्जा देण्यात आला. पाच एकरांपर्यंतच्या जमिनीवरील महसूल रद्द करण्यात आला होता.

follow us