NEET UG Paper Leak Case : गेल्या काही दिवसांपासून देशाच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरलेला NEET पेपर लीक प्रकरणात (NEET UG Paper Leak) सीबीआयने (CBI) मोठी कारवाई करत पाटणा येथून दोन जणांना अटक केली आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, सीबीआयने या प्रकरणात कारवाई करत पाटणामधून मनीष कुमार आणि आशुतोष कुमार यांना अटक केली आहे. पाटणा येथील विशेष सीबीआय न्यायालयाने दोघांनाही सीबीआय कोठडीत पाठवले आहे.
सध्या समोर आलेल्या माहितीनुसार, मनीष कुमार आणि आशुतोष कुमार यांनी परीक्षेपूर्वी उमेदवारांना सुरक्षित जागा उपलब्ध करून दिली होती, जिथे त्यांना लीक झालेल्या पेपरमधील प्रश्न आणि उत्तरे देण्यात आले होते. तसेच या प्रकरणात आतापर्यंत सीबीआयकडून सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
5 मे रोजी देशातील 571 शहरांतील 4,750 केंद्रांवर देशभरातील सरकारी आणि खाजगी संस्थांमधील एमबीबीएस, बीडीएस, आयुष आणि इतर संबंधित अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी NTA द्वारे NEET-UG परीक्षा आयोजित करण्यात आली होती. तर या परीक्षेचा निकाल 14 जून रोजी जाहीर करण्यात येणार होता मात्र 4 जून रोजीच या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला होता त्यानंतर या परीक्षेवर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते.
माहितीनुसार, या परीक्षेला 23 लाखांहून अधिक उमेदवार बसले होते. परीक्षेबद्दल वाद वाढल्यानंतर सरकारने या प्रकरणाचा तपास सीबीसीयकडे दिला होता. सीबीआयने या प्रकरणाचा तपासा करताना पहिला एफआयआर रविवारी दाखल केला होता.
…तर भारतीय संघ करणार थेट फायनलमध्ये एंट्री, ICC कडून मोठी घोषणा
तर यापूर्वी सीबीआयने हजारीबागसह इतर ठिकाणी तपास केला होता तसेच एसबीआय बँकेत देखील सीबीआयकडून तपास करण्यात आला होता. बँकेतील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून तेथील अधिकारी व कर्मचाऱ्यांची चौकशी करण्यात आली.
आघाडीत ठिणगी! राऊतांच्या ‘त्या’ वक्तव्यावर थोरात, वडेट्टीवार, पाटलांचा आक्षेप