BJP Observers : तीन राज्यांमध्ये मुख्यमंत्री निवडीसाठी लगबग; राजस्थानमध्ये तावडे घेणार कल

BJP Announces Observers For MP Rajasthan And Chhattisgarh For CM Face : मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमधील विधानसभा निवडणुका जिंकल्यानंतर मुख्यमंत्रीपादाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. यातच आता तिन्ही राज्यांचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा निवडण्यासाठी भाजपनं निरीक्षकांची नावे जाहीर केली असून, हे निरीक्षक प्रत्येक राज्यातील आमदारांशी बोलून मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा करणार आहेत. राजस्थानची जबाबदारी […]

BJP Observers : तीन राज्यांमध्ये मुख्यमंत्री निवडीसाठी लगबग; राजस्थानमध्ये तावडे घेणार कल

Letsupp Image 2023 12 08T115748.952

BJP Announces Observers For MP Rajasthan And Chhattisgarh For CM Face : मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमधील विधानसभा निवडणुका जिंकल्यानंतर मुख्यमंत्रीपादाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. यातच आता तिन्ही राज्यांचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा निवडण्यासाठी भाजपनं निरीक्षकांची नावे जाहीर केली असून, हे निरीक्षक प्रत्येक राज्यातील आमदारांशी बोलून मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा करणार आहेत. राजस्थानची जबाबदारी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांना देण्यात आली असून, त्यांचे सहाय्यक सर्वेक्षक म्हणून विनोद तावडे (Vinod Tawade) आणि सरोज पांडे यांचे नाव जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे राजस्थानचा मुख्यमंत्री जाहीर करण्यात तावडेंची मोठी भूमिका असणार आहे.

रेपो रेट जैसे थे! RBI चं न्यू इअर गिफ्ट; EMI वाढणार नाही; आरोग्य अन् शिक्षण क्षेत्रासाठी मोठ्या घोषणा

दुसरीकडे मध्य प्रदेशात निरीक्षक म्हणून हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर, के लक्ष्मण आणि आशा लाक्रा यांची निवड करण्यात आली असून, छत्तीसगडचा मुख्यमंत्री चेहरा निवडण्याची जबाबदारी केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनेवाल यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. अर्जुन मुंडा हे त्यांचे सहाय्यक सर्वेक्षक म्हणून काम करणार आहेत.

वसुंधरा राजेंचा मुलगा दुष्यंतवर आमदारांना घेरल्याचा आरोप; काय म्हणाले समर्थक आमदार?

10 डिसेंबरला संपणार CM पदाच सस्पेन्स

तीन राज्यातील विजयानंतर आता कुणाला मुख्यमंत्री करायचे यावर विचारमंथन सुरू आहे. यावर तोडगा काढण्यासाठी आता भाजपकडून  निरीक्षकांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. हे निरीक्षक संबंधित राज्यातील आमदारांशी चर्चा करून वरिष्ठांना अहवाल सादर करणार आहे. त्यानंतर आहवालाच्या आधारावर तीन राज्यांमध्ये कोणत्या नेत्यांना मुख्यमंत्रीपद मिळणार हे निश्चित केले जाणार आहे. येत्या 10 डिसेंबर रोजी मध्य प्रदेशातील भाजप विधीमंडळ पक्षाची बैठक बोलावण्यात आली असून, दिल्लीहून पाठवलेल्या निरीक्षकांच्या उपस्थितीत ही बैठक होणार आहे. त्यामुळे 10 डिसेंबरला मुख्यमंत्र्यांच्या नावावरून सस्पेन्स संपण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

विजयाचे श्रेय घेण्याची स्पर्धा

मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडच्या विधानसभा निवडणुकीत भाजपने मोठा विजय मिळवला आहे. तिन्ही राज्यांमध्ये भाजपने संभाव्य मुख्यमंत्र्याच्या नावाची घोषणा केली नव्हती. मात्र, मध्य प्रदेशात शिवराजसिंह चौहान विजयाचे श्रेय घेण्यात व्यस्त आहेत, तर राजस्थानमध्ये वसुंधरा राजे आणि छत्तीसगडमध्ये रमणसिंग यांच्या विजयाच्या श्रेयवादावरून स्पर्धा सुरू आहे.

राजस्थानमधील हाय-व्होल्टेज ड्रामा

राजस्थानमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी हाय-व्होल्टेज ड्रामा बघायला मिळत असून, माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी समर्थक आमदारांना रिसॉर्टमध्ये हलवल्याचा आरोप करण्यात आला आहे. एवढेच नव्हे तर, या सर्व घडामोडींमध्ये राजे हायकमांडच्या आदेशानंतर दिल्लीत आल्या होत्या. या बैठकीनंतर बाहेर पडताना त्यांच्या चेहऱ्यावर हसू होते. त्यामुळे त्या मुख्यमंत्री होणार असल्याच्या अटकळांनी जोर धरला आहे.

Telangana : आधी पती, नंतर भाऊ गमावला! नक्षलवादी ते मंत्रिपदाची शपथ; सीताक्कांचा प्रवास

CM पदाच्या शर्यतीत कोणते चेहरे

मध्य प्रदेशात मुख्यमंत्रीपदासाठी नरेंद्र सिंह तोमर, केंद्रीय मंत्री प्रल्हाद सिंह पटेल आणि शिवराज सिंह चौहान यांची नावे सातत्याने समोर येत आहेत. तर, राजस्थानमध्ये बाबा बालकनाथ, वसुंधरा राजे यांच्या नावांची जोरदार चर्चा असून, छत्तीसगडमध्ये प्रदेशाध्यक्ष अरुण साओ, गोमती साई, माजी मंत्री लता उसेंडी, रमण सिंह यांच्या नावांची चर्चा आहे. आता यापैकी नेमक्या कोणत्या नेत्याच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ पडणार हे पाहणे महत्वाचे आहे.

Exit mobile version