तावडे, तापकीर अन् जाधव : राजकीय विरोधक झाले पंढरीच्या वाटेवर ‘वारकरी’
पंढरपूरच्या वाटेवर चालणाऱ्या वारकऱ्याला ना नाव असतं ना गाव असतं ना कोणतं पद. सगळेच एकमेकांसाठी ‘माऊली’ असतात. अगदी राजकीय विरोधक असला तरीही तो पंढरीच्या वाटेवर कटूता विसरुन चालू लागतो. असेच एक दृश्य संत ज्ञानेश्वर माऊलींच्या वारीत पाहायला मिळाले. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे ((Vinod Tawade), भाजपचे खडकवासल्याचे आमदार भीमराव तापकीर (Bhimrao Tapkir) आणि शिवसेना (UBT) खासदार संजय उर्फ बंडू जाधव (Sanjay Jadhav) या तिघांनी एकत्रित पायी वारीचा प्रवास केला. यावेळी तिघांमध्ये राजकारणातील कटूतेवर चर्चा झाली. याबाबत याबाबत स्वतः संजय जाधव यांनी लेट्सअप मराठीशी बोलताना खुलासा केला. (Vinod Tawade, MLA Bhimrao Tapkir And MP Sanjay Jadhav wallk toghther in Padharpur Wari)
संजय जाधव म्हणाले, मी 1997 पासून नियमित वारीला येत असतो. सगळ्या सोबत आम्ही हरिनाम गजराचा करत करत पुढे जात असतो. इथे कोणी कोणाला नावाला सुद्धा बोलत नाही हे वैशिष्ट्य आहे या सोहळ्याचे. प्रत्येक जण माऊली माऊली म्हणून हाक मारत असतो. मग महिला असो, लहान बालक असो किंवा वयस्कर माणूस. इतकी आपुलकी असते एक दुसऱ्याबद्दल. इतरत्र असं कुठेही बघायला मिळत नाही.
‘तोच परिवार मुंबईकरांचा खरा गुन्हेगार!’; मुंबई तुंबताच भाजपाचा ठाकरेंवर हल्लाबोल
यावर लेट्सअप मराठीचे प्रतिनिधी विष्णू सानप यांनी जाधव यांना नेमकी हिच गोष्ट महाराष्ट्राच्या राजकारणात बघायला मिळत नाही, असं विचारलं. महाराष्ट्रात राजकारणाची जी आता सध्याची भाषा आहे ही पुरोगामी महाराष्ट्राची संस्कृती नाही. शिवसेनेचे नेते असतील, भाजपचे नेते असतील सर्वच पक्षाचे नेते एकमेकांवर तुटून पडतात. अत्यंत खालच्या पातळीवरची भाषा असते, असे जाधव यांना विचारले.
विठू माऊलीचा फुलला मळा
हरिनामाचा रंगला सोहळा!#Wari2023 pic.twitter.com/Uk7hqJ3RvM— Vinod Tawde (@TawdeVinod) June 22, 2023
यावर ते म्हणाले, राजकारणामध्ये तुम्ही म्हणाला तसे भरपूर कटूता आलेली आहे. एवढी कटूता नसायला पाहिजे. कारण मी, विनोद तावडे आणि भीमराव तापकीर आम्ही तिघेजण जेजुरी ते वाल्ह्याचा प्रवास करत होतो. त्या प्रवासाच्या वेळेस तावडे साहेब स्वतः मला म्हणाले, खासदार साहेब आपण सभागृहामध्ये पाणी प्रश्नावर, सिंचनाच्या विषयावर अजितदादाला खूप टार्गेट केलं. पण दुपारी कधी वेळ मिळाल्यावर आपण त्यांच्या केबिनला जाऊन त्यांचा डब्यामध्ये जेवण करायचो.
‘BRS’ ने महाराष्ट्रात उधळला गुलाल! ‘या’ गावातील सत्तेच्या चाव्या घेतल्या ताब्यात
आज स्वतःच्या पक्षात सुद्धा एवढी एक वाक्यता राहिलेली नाही. एवढी विसंगती निर्माण झाली आहे. हे राजकारण यापूर्वी कधी नव्हतं. आता असं वाटतं की पुन्हा राजकारणात पडूच नये. शेवटी एवढी कटूता नसायला पाहिजे. डावी, उजवी विचारसरणी किंवा एक सत्तेत आहेत, एक विरोधात आहेत. वैचारिक लढाई ही मी समजू शकतो पण सत्तेसाठी सर्वकाही हे जे काही भारतीय जनता पक्षाने अवलंबले आहे, ते समाजालाच नाही तर अखंड देशाला घातक आहे, अशीही भीती खासदार जाधव यांनी व्यक्त केली.