‘BRS’ ने महाराष्ट्रात उधळला गुलाल! ‘या’ गावातील सत्तेच्या चाव्या घेतल्या ताब्यात

‘BRS’ ने महाराष्ट्रात उधळला गुलाल! ‘या’ गावातील सत्तेच्या चाव्या घेतल्या ताब्यात

BRS News : तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (K. Chandrashekhar Rao) यांच्या भारत राष्ट्र समिती पक्षाने (BRS) महाराष्ट्रात पक्षविस्ताराचा धडाकाच लावला आहे. राज्यातील शहरांत अगदी गाव खेड्यांत ‘अबकी बार किसान सरकार’ अशी टॅगलाइन असलेले फलक दिसत आहेत. काही मोठ्या नेत्यांनी या पक्षात प्रवेशही केला आहे. इतकंच नाही तर पक्षाने आता राज्यात विजयी घोडदौडही सुरू केली आहे. छत्रपती संभाजीनगर (Chatrapati Sambhaji Nagar) जिल्ह्यात पक्षाला घवघवीत यश मिळालं आहे.

गंगापूर तालुक्यातील सावखेडा येथील भारत राष्ट्र समितीच्या प्रथम सरपंच सुषमा विष्णू मुळे यांची सावखेडा ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी बिनविरोध निवड झाली आहे. याआधी याच तालुक्यातील आंबेलोहोळ गावातील पोटनिवडणुकीत पक्षाचे उमेदवार गफार सरदार पठाण यांनी विजय मिळवला.

चंद्रशेखर रावांनी पेरलेलं उगवलं! BRS ला महाराष्ट्रात मिळालं पहिलं यश

दरम्यान, या उमेदवारांच्या विजयामुळे बीआरएसची जिल्ह्यात दमदार एन्ट्री झाल्याची चर्चा आहे. या पक्षात कार्यकर्ते, नेत्यांच्या प्रवेशाची संख्याही सातत्याने वाढत चालली आहे. असाच वेग राहिला तर बीआरएसला राज्यात रोखणे कठीण होईल, असेही सांगण्यात येत आहे. आगामी निवडणुकीत बीआरएस शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, एमआयएम यांसह सर्वच पक्षांना आव्हान देणारा ठरेल, असे गणित मांडले जात आहे.

या पक्षाने राज्यात एन्ट्री घेतली ती शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर. पक्षाचे प्रमुख के. चंद्रशेखर राव आपल्या सभांतूनही हा मुद्दा प्रकर्षाने मांडतात. या व्यतिरिक्त राज्यातील विजेचा प्रश्न, पाण्याचा प्रश्न या प्रश्नांवरही सरकारला घेरताना दिसतात. या परिस्थितीचा विचार करून पक्ष राज्यात पूर्ण ताकदीने उतरला आहे. तेलंगणा पॅटर्नप्रमाणे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनाही चांगले दिवस आणू असे म्हणत काही महिन्यांपूर्वी भारत राष्ट्र समितीने नांदेडमार्गे महाराष्ट्रात एन्ट्री घेतली. नांदेडमध्ये भव्य जाहीर सभा घेत माजी आमदारांचे पक्षात प्रवेश घडवून आणले. त्यानंतर छत्रपती संभाजीनगरला सभा पार पडली. यातही माजी आमदार आणि विविध प्रमुख पक्षांच्या पदाधिकाऱ्यांचे प्रवेश झाले.

BJP : आजचे निवडणूक प्रमुख हेच उद्याचे उमेदवार? बावनकुळेंनी इच्छुकांना दिला सूचक संदेश

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube