Download App

मुलांना निवडणुकांच्या राजकारणात आणू नका; लोकसभांच्या तोंडावर EC च्या राजकीय पक्षांना सूचना

Image Credit: Letsupp

Election 2024 : आगामी लोकसभा निवडणुका (Loksabha Election) उंबरठ्यावर येऊन ठेपल्या आहेत. निवडणुकांसाठी देशातील सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी सुरु झाल्या आहेत. अशातच आता केंद्रीय निवडणूक आयोगाकडून (Election Commission) राजकीय पक्षांना महत्वपूर्ण सूचना देण्यात आल्या आहेत. निवडणुकीच्या प्रचारात मुलांना राजकारणात आणू नका, असे निर्देश केंद्रीय निवडणूक आयोगाकडून देण्यात आल्या आहेत.

‘त्या’ रात्री उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंच्या पाठीत खंजीर खुपसला, रामदास कदमांची जहरी टीका

निवडणूक आयोगाने म्हटलं, निवडणुकीतील प्रचारासाठी अथवा कोणत्याही कामांमध्ये राजकीय पक्षांनी मुलांचा सहभाग ठेऊ नका. निवडणुकीच्या प्रक्रियेदरम्यान, कोणत्याही प्रकारे मुलांचा वापर राजकीय पक्षांनी करु नये, असे निर्देश देण्यात आले आहेत. निवडणुकीच्या काळात राजकीय पक्षांचे गाणे, चिन्ह, भूमिका शक्तीप्रदर्शन करण्यासाठी मुलांचा वापर करण्यात येत असतो. मात्र, निवडणुकीत अशा पद्धतीने मुलांचा वापर थांबवण्यात यावा, असं केंद्रीय निवडणूक आयोगाने स्पष्ट केलं आहे.

श्रीकांत शिंदेंची गुंड हेमंत दाभेकरशी भेट घडवणं भोवलं, अनिकेत जावळकरची युवा सेनेतून हकालपट्टी

एखाद्या राजकीय नेत्याच्या जवळचे मुलांचे पालक किंवा पालकांसोबत असलेल्या मुलाची उपस्थिती कोणत्याही निवडणूक प्रचाराच्या प्रक्रियेमध्ये सहभाग असल्यास मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन आहे असं समजलं जाणार नसल्याचंही केंद्रीय निवडणूक आयोगाने स्पष्ट केलं आहे.

सहा तासांचे ऑपरेशन, सहा गोळ्या बाहेर काढल्या… : महेश गायकवाडांच्या तब्येतीबाबत मोठी माहिती

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाकडून हे निर्देश देताना मुंबई उच्च न्यायालयाच्या 2014 च्या आदेशाचा हवाला देण्यात आला आहे. या हवाल्यानूसार राजकीय पक्षांनी कोणत्याही निवडणूकीतील प्रक्रियांमध्ये लहान मुलांच्या सहभागास परवानगी देण्यात येऊ नये, असं म्हटलं आहे.

दरम्यान, केंद्रीय निवडणूक आयोगाकडून संबंधित क्षेत्रातील जिल्हा निवडणूक अधिकारी आणि निवडणूक अधिकारी यांना बालकामगार कायदे आणि निवडणूक मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्याचे आदेश करण्याबाबतचे निर्देश देण्यात आले आहे. जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांच्या अधिपत्याखाली या निर्देशाचे उल्लंघन झाल्यास कठोर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार असल्याचंही स्पष्ट करण्यात आलं आहे.

follow us

वेब स्टोरीज