Congress Leader Aanand Sharma on Modi Government for India’s influence in the world is decreasing : कॉंग्रेस नेते आनंद शर्मा यांनी केंद्र सरकारच्या परराष्ट्र धोरणावरून मोठा उपस्थित केला आहे. विशेष म्हणजे हेच आनंद शर्मा सुप्रिया सुळेंच्या अध्यक्षतेखाली तयार करण्यात आलेल्या सर्वपक्षीय नेत्यांच्या शिष्टमंडळामध्ये सदस्य होते. जे शिष्टमंडळ पाकिस्तानच्या कारवायांबाबत कतर, मिस्र, इथियोपिया आणि दक्षिण अफ्रिका दौऱ्यावर गेले होते. त्यामुळे त्यांनी या विषयावर संसदेत चर्चा करण्याची देखील मागणी केली आहे.
नेमकं काय म्हणाले आनंद शर्मा?
केंद्र सरकारच्या परराष्ट्र धोरणावर टीका करताना शर्मा म्हणाले की, भारताच्या परराष्ट्र धोरणामध्ये प्रचंड त्रुटी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे भारताचा जगातील प्रभाव कमी होत आहे. आपल्याला शेजारील देशांशी सावधपणे चर्चा करावी लागणार आहे. कारण भारताची इस्त्रायल-हमास युद्धादरम्यानची गाजाबाबतची बोलण्याची भूमिका धक्कादायक होती. अनेक देशांना भारताने या विषयावर बोलण्याच्या अपेक्षा होती. कारण या युद्धामध्ये पॅलेस्टाईन मधील लोकांवर झालेले हल्ले तेथील नरसंहार आणि भूकबळीचे वाढलेले प्रमाण अत्यंत निंदनीय आहे.
उत्तम जानकरांची आमदारकी धोक्यात, जात प्रमाणपत्र प्रकरणात नोटीस; जाणून घ्या प्रकरण
भारताचे इस्त्रायल आणि पॅलेस्टाईन दोन्ही राष्ट्रांची चांगले संबंध आहेत. त्यामुळे भारताने इस्त्रायला हल्ले थांबवण्याबद्दल का सांगितलं नाही? त्याचबरोबर पुढे शर्मा म्हणाले की, अमेरिकेसोबत देखील कोणत्याही दबावाखाली व्यापारी करार केला जाऊ नये. यामध्ये कृषी आणि पशु पालन उद्योगांबाबत तर मुळीच नाही. त्याबाबत आगामी संसदेच्या अधिवेशनामध्ये मुद्दा उपस्थित केला जाणार असल्याचेही त्यांनी म्हटलं.
मात्र भारताचे परराष्ट्र धोरण पुर्वी असं नव्हतं. भारताने यापूर्वी तटस्थ भूमिका घेतली आहे. नेतृत्व केलं आहे. वर्ण भेद आणि स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये ही भूमिका महत्त्वाची राहिली. 1950 कोरिया संकट सुरू असताना जगाने भारताकडे बघितलं.
ज्याची भीती होती तेच झालं, आव्हाड आणि पडळकर समर्थकांची विधानभवनातच मारामारी… कपडे फाटेपर्यंत मारलं
नैतिकता आणि मानवता ही भारताची शक्ती होती. मात्र सध्याच्या सरकारने ती कमजोर केली आहे. एकांगी निर्णय घेतले जात आहेत. याचा परिणाम देशाच्या हितावर आणि परराष्ट्र धोरणावर होत आहे. त्यामुळे सरकारने आत्मचिंतन करावे. त्यावर आगामी अधिवेशनामध्ये चर्चा केली जावी अशी मागणी देखील शर्मा यांनी केली आहे.