युती झाल्यास मुंबईत महापालिका ठाकरे बधूंच्या ताब्यात, कोण किती जागा जिंकणार, वाचा सर्व्हे काय सांगतो ?

BMC Election Survey: आगामी काळात होत असलेल्या मुंबई महापालिका निवडणुकीची (Mumbai Municipal Corporation elections) तयारी सर्वच पक्षांनी केली आहे. ठाकरे गटानेही मनसेला (MNS) सोबत घेण्यासाठी प्रयत्न सुरू केलेत. मात्र, विजय मेळाव्यात एकत्र आलेले ठाकरे बंधूची महानगरपालिका निवडणुकीत युती होणार की नाही, हे अद्याप गुलदस्त्यात आहे. दरम्यान, राज ठाकरे (Raj Thackeray) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) एकत्र आल्यास ते मुंबईत १०० हून अधिक जागा जिंकतील, असा अंदाज आहे. उबाठानं मुंबईत केलेल्या एका सर्व्हेतून ही आकडीवारी समोर आली आहे.
विधानभवन पायऱ्यांजवळ आव्हाड अन् पडळकरांचे कार्यकर्ते भिडले; विधानसभा अध्यक्षांनीही घातलं लक्ष
२०१७ मध्ये झालेल्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीत एकसंध शिवसेनेने ८४ जागा जिंकल्या होत्या. भाजपला ८२ जागा मिळाल्या होत्या. तर मनसेला फक्त ७ जागा मिळाल्या होत्या. दरम्यान, शिवसेनेने ८४ जागा मिळाल्या होत्या. यातील ४० हून अधिक माजी नगरसेवकांपैकी ठाकरेंची साथ सोडत शिंदे गटात प्रवेश केलाय. भाजप आणि शिंदेंच्या सेनेनं मुंबईत त्यांची ताकद वाढवण्याचे प्रयत्न सुरू केलेले आहेत. तर दुसरीकडे, उद्धव ठाकरे मनसेला सोबत घेण्याच्या प्रयत्नात आहेत. ठाकरे बंधूंची युती झाल्यास परिस्थितीत काय असेल , याचा एक ठाकरेंच्या शिवसेनेनं मुंबईत केलाय. दोन भाऊ एकत्र येऊन निवडणूक लढल्यास त्यांना १०० पेक्षा जास्त जागा मिळतील, अशी आकडेवारी या सर्व्हेतून समोर आली. विशेष म्हणजे, यात मनसेला २५ पेक्षा जास्त जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला.
भारतात विकलं जाणार नॉनव्हेज दूध; अमेरिका अन् भारतातील डिल नेमकी काय?
२०१२ च्या महानगरपालिका निवडणुकीत मुंबईत मनसेने २८ जागा जिंकल्या होत्या. मुंबई महानगरपालिकेत मनसेची ही आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी राहिली आहे. जर उबाठासोबत युती झाली झाल्यास मनसे त्यांच्या सर्वोत्तम कामगिरीच्या जवळ येऊ शकते.
दरम्यान, मराठी मतदार बहुसंख्य असलेल्या गिरगाव, माझगाव, ताडदेव, लालबाग, परळ, भोईवाडा, दादर, माहीम, जोगेश्वरी, वांद्रे, मागाठाणे, गिरगाव, मुलुंड पूर्व, भांडुप, कांजूरमार्ग, विक्रोळी यासारख्या भागात ठाकरे बंधूंच्या पक्षंना मोठं यश मिळू शकतं.
युती झाल्यास या दोन्ही पक्षांना एकत्रितपणे मराठी मतांचे विभाजन टाळता येऊ शकते. त्याचा फटका भाजपला आणि शिंदे गटाला बसू शकतो. त्यामुळं शिंदेंच्या शिवसेनेची धाकधुक वाढली आहे.
युती न झाल्यास ठाकरे बंधूंना फटका…
मात्र, ठाकरे बंधूंची युती न झाल्यास त्याचा फटका दोन्ही ठाकरेंना बसले. राज ठाकरेंच्या यांच्या मनसेला फक्त १० जागा मिळू शकतात. तर उद्धव यांच्या शिवसेनेला फक्त ६५ जागांवर समाधान मानावे लागू शकते.