ज्याची भीती होती तेच झालं, आव्हाड आणि पडळकर समर्थकांची विधानभवनातच मारामारी… कपडे फाटेपर्यंत मारलं

Awhad and Padalkar activists clashed near the steps of the Vidhan Bhavan; Assembly Speaker sought a report : विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशना दरम्यान विधानभवन पायऱ्यांजवळ राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचे कार्यकर्ते भिडल्याचं पाहायला मिळालं. याबाबत आता विधानसभा अध्यक्षांनी लक्ष घातलं आहे. याबाबत त्यांनी अहवाल मागवला आहे.
काय सांगता? गाईचं दूध मांसाहारी…भारत VS अमेरिका ट्रेड वाद, जाणून घ्या सविस्तर
विधानभवनाच्या लॉबीतच राडा; आव्हाड आणि पडळकरांच्या कार्यकर्त्यांची हाणामारी #jitendraawhad #Gopichandpadalkar @Dev_Fadnavis @ShivsenaUBTComm @Awhadspeaks @GopichandP_MLA pic.twitter.com/rWpI0CDrN6
— LetsUpp Marathi (@LetsUppMarathi) July 17, 2025
नेमकं प्रकरणं काय?
राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचे कार्यकर्ते विधानभवनाच्या पायऱ्यांजवळ उभे होते. त्यावेळी त्यांच्यामध्ये धक्काबुक्की झाली. त्यांचे हे वाद 5 ते 10 मिनिटं सुरू होते. तेव्हा हे वाद सोडवायला वेळ लागला. दरम्यान बुधवारी 16 जुलै रोजी स्वत: जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकर यांच्यामध्ये वाद झाला होता. त्यानंतर आज त्यांचे कार्यकर्ते एकमेकांशी भिडले आहेत.
दरम्यान जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकर यांच्यामध्ये झालेला हा वाद काही गेल्या दोन दिवसांचा नाही. तर गेल्या कित्येक दिवसांपासून हे दोन नेते आमने-सामने येत आहेत. याबाबत बोलताना आव्हाड म्हणाले की, माझ्या कार्यकर्त्यांनी नाही तर पडळकरांच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. असं म्हणत आव्हाड हे माध्यमांवर भडकल्याचं पाहायला मिळालं. त्यांनी हल्ला कोणी केला असा प्रश्न उपस्थितांना विचारत त्यांच्या आलेल्या उत्तरातून महाराष्ट्राला उत्तर मिळालं असल्याचं म्हटलं आहे.