Rahul Gandhi On Pm Narendra Modi : निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून (Pm Narendra Modi) मॅच फिक्सिंगचा प्रयत्न केला असल्याचा गंभीर आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केला आहे. दरम्यान, लोकसभा निवडणूक (Loksabha Election) जाहीर होताच इंडिया आघाडीच्या (India Alliance) सर्वच पक्षांकडून कंबर कसण्यात येत असल्याचं दिसून येत आहे. इंडिया आघाडीच्या नेत्यांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आरोप केले जात आहेत. दरम्यान, दिल्लीत रामलीला मैदानात इंडिया आघाडीकडून लोकशाही वाचवा रॅली काढण्यात आली. यावेळी आयोजित सभेत राहुल गांधी बोलत होते. यावेळी गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.
Rohit Saraf : अखेर 11 वर्षांनंतर रिलीज झाला रोहित सराफचा ‘वो भी दिन थे’; लिहिली खास पोस्ट
राहुल गांधी म्हणाले, मोदी आणि भाजपकडून आमचे बॅंक अकाऊंट बंद करण्यात आले आहेत. पैशांचा वापर करुन विविध राज्यांमधील सरकार पाडली जात आहेत. या निवडणुकीत आमच्याकडे पोस्टर लावण्यासाठीही पैसे नाहीत. इंडिया आघाडीच्या नेत्यांना धमकावलं जात आहे. त्यासाठी मोदींनी अंपायर निवडले आहेत. या निवडणुकीआधीच मोदींकडून मॅच फिक्सिंग करण्याच प्रयत्न केला जात आहे. मॅच सुरु होण्याआधीच दोन खेळांडूना अटक करण्यात आल्याचा हल्लाबोल राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर केला आहे. झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी कथित जमीन घोटाळ्या प्रकरणी तर मद्य घोटाळ्याप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात आली आहे. त्यावरुन गांधींनी आरोप केला आहे.
तुम्हाला निवडणुकीत ज्याला पाडायचे, त्याला पाडा; मनोज जरांगेंची लोकसभा निवडणुकीतून माघार
तसेच भाजपने ईव्हीएमशिवाय निवडणुका घेतल्या तर 180 चा आकडाही गाठता येणार नाही. मोदी आणि भाजपकडून मीडियावर दबाव टाकला जात आहे, पण मोदी सरकार जनतेचा आवाज दाबू शकत नाही. जनतेचा आवाज दाबण्याची कोणाचीही ताकद नाही. ईडी सीबीआयसोबत देश चालवण्याचे यांचे विचार असून देशाला धमकावून देश चालवला जाऊ शकत नाही. भाजपकडून नेत्यांना जेलमध्ये टाकलं जात असल्याचा आरोपही गांधी यांनी केला आहे.
ज्या दिवशी संविधान संपेल त्या दिवशी भारत देश वाचणार नाही. देशाला धमक्यांनी नाही चालवलं जाऊ शकत. भारतात संविधान संपल्यानंतर हा देश वाचू शकत नाही वेगवेगळे राज्य तयार होतील, असंही राहुल गांधी म्हणाले आहेत. या रॅलीमध्ये राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्यासह उद्धव ठाकरे, अखिलेश यादव, संजय राऊत, सीताराम येचुरी, आदित्य ठाकरे, शरद पवार, आतिशी गोपाल राय, मेहबुबा मुफ्ती आणि जम्मू -काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्लाही उपस्थित आहेत.