Pooja Khedak family company connection : वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर (Pooja Khedak) यांचं एक प्रकरण समोर आलं अन् त्याचा आता वनवा झालाय अशी परिस्थिती आहे. पूजा खेडकर यांच्यासंबंधी गेली महिनाभरापासून रोज एक नवीन प्रकरण समोर येत आहे. कुठं अपंग प्रकरण, कुठं अनेकवेळा युपीएसीला दिली परीक्षा, खोटी प्रमाणपत्र, असे असंख्य प्रकरण समोर येत असतानाचं त्यांच्या आई मनोरमा खेडकर यांचेही काही प्रताप समोर आले. त्यांनी शेतकऱ्यांना थेट बंदूक हातात घेत धमकावलं. यामध्ये पूजा खेडकर यांच्या वडिलांचाही सहभाग आहे. त्यांच्या उत्पन्नाचेही प्रश्न उपस्थित झाले. दरम्यान, आता या खेडकर कुटुंबाचं आण कंपन्यांचं एक नव प्रकरण सोर आलं आहे.
आठ कंपन्यांशी संबंध मुदत संपल्यानंतरही पूजा खेडकर नॉट रिचेबल; मसुरीला हजर होण्याची मुदत संपली..
जात आणि अपंगत्व कोट्याचा गैरवापर केल्याच्या आरोप असलेल्या प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर आणि त्यांचं कुटुंबीयांचा आठ कंपन्यांशी संबंध असल्याचं समोर आलं आहे. यातील पाच कंपन्या खेडकर यांचे पालक, दिलीप आणि मनोरमा यांच्याशी संबंधित पुण्यातील व्यावसायिक पत्त्यावरून चालवल्या जात असल्याचं उघड झालं आहे. एकूण, आठपैकी सात कंपन्या डिलिजेन्स ग्रुपच्या छत्राखाली स्थापन केल्या आहेत. तर, आठवी म्हणजे पूजा ऑटोमोबाईल्स ही एक फर्म असून यामध्ये पुजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर तिच्या भावाबरोबर भागीदार आहे.
हाच पत्ता रेशन कार्डमध्ये तुरुंगातही मनोरमा खेडकरचा तोरा कायम; चॉकलेट्स अन् बऱ्याच गोष्टींची पोलिसांकडं मागणी
डिलिजन्स कंपन्यांमध्ये थर्मोवेरिटा इंजिनिअरिंगचा समावेश आहे. या कंपनीच्या नावे दोन अलिशान गाड्या आहेत. या कंपनीच्या शेअरहोल्डर्समध्ये लता बांगर यांचा समावेश आहे. लता बांगर या दिलीप खेडकर यांची बहीण असून महादेव बांगरसुद्धा या कंपनीचे शेअरधारक आहेत. पुण्यातील तळवडे येथील व्यावसायिक भूखंड मनोरमा खेडकर यांच्या नावे असून पूजाने हाच पत्ता रेशन कार्डमध्ये नमूद केला आहे. हे रेशन कार्ड त्यांनी अपंगत्वाचं प्रमाणपत्र मिळवण्यासाठी दिलं होतं. तर, इतर डिलिजेन्स कंपन्यांमध्ये दोन ‘साखर आणि कृषी’ कंपन्या समाविष्ट आहेत, त्या सर्वांमध्ये खेडकर किंवा त्यांचे जवळचे नातेवाईक आणि त्यांच्याशी जोडलेले इतर संचालक किंवा भागधारक म्हणून सूचीबद्ध आहेत.
या कंपन्यांमध्ये शेअरहोल्डर पूजा खेडकरांंचा मसुरीला गेल्याच नाहीत? मुदत संपल्यानंतरही नॉट रिचेबल; कारवाईची शक्यता..
2018 मध्ये डिलिजेन्स ग्रुप ऑफ कंपन्यांमधील डिलिजेन्स इन्फ्राप्रोजेक्ट्समध्ये पूजाने 20% हिस्सा घेतला होता. तीचा भाऊ पीयूष यांच्याकडे 2022 मध्ये ओम दीप शुगर अँड ॲग्रोमध्ये 50% हिस्सा होता. त्यांची आई मनोरमा ही तीन कंपन्यांमध्ये – डिलिजेन्स शुगर अँड ॲग्रो, डिलिजेन्स (इंडिया) कॉर्पोरेशन आणि डिलिजेन्स इन्फ्राप्रोजेक्ट्समध्ये 2018 पर्यंत शेअरहोल्डर होती. ओम दीप शुगर आणि ॲग्रो वगळता, डिलिजन्स ग्रुपच्या इतर सहा कंपन्यांपैकी एकाही कंपनीने 2019 पासून त्यांचे वार्षिक विवरणपत्र भरलेलं नाही.
नातेवाइकांचाही संबंध पूजा खेडकरच्या अपंगत्व प्रमाणपत्राबाबत मोठा निर्णय; प्रशासनाच्या आदेशाने खळबळ
दिलीप खेडकरचा मेहुणा महादेव हा चार ड्यू डिलिजेन्स कंपन्यांशी संबंधित रेकॉर्डवर आहे. तसंच, महादेव मनोरमा खेडकरद्वारे अहमदनगर येथे चालवल्या जाणाऱ्या ऑटोमोबाईल्स ट्रॅक्टर डीलरशिपमध्ये देखील भागीदार आहे. महादेव यांनी दावा केलाय की, या कंपन्यांच्या कामकाजात त्यांचा सहभाग नाही. ‘आम्ही भागीदार आहोत पण कंपन्या आता बंद झाल्या आहेत,’ तसंच, यामध्ये इतर लोकांचाही सहभाग होता. मला या व्यवसायांची फारशी माहिती नाही. खेडकर हे आमचे नातेवाईक आहेत. लता ही दिलीप खेडकर यांची बहीण आहे.
पूजाचा चुलत भाऊ कंपन्यांशी संबंधित पूजा खेडकरांच्या अडचणीत आणखी वाढ; राष्ट्रीय मागासवर्ग आयोगही करणार तपास
पूजा खेडकरांचा चुलत भाऊ संचित हांगे चार ड्यू डिलिजेन्स कंपन्यांशी संबंधित आहे. पुण्यातील इंदापूर तालुक्यात राहणारे संचितचे वडील तानाजीराव हांगे हे शेतकरी आणि काँग्रेसचे माजी तालुका अध्यक्ष आहेत. तानाजीराव म्हणाले, ‘संचित हा व्यवसायाने शेतकरी आहे आणि त्याचा कंपन्यांमधील सहभागाबद्दल मला फारशी माहिती नाही. पूजाची आई मनोरमा माझ्या पत्नीची धाकटी बहीण आहे.
अँड ॲग्रो प्रायव्हेट लिमिटेड जमीन खरेदी ते मनोरमा खेडकरांना धमकी; वकीलांचा न्यायालयात भलताच दावा…
कविता बेंडेले आणि त्यांचा मुलगा आकाश हे थर्मोव्हरिटासह पाच ड्यू डिलिजेन्स कंपन्यांमध्ये सहभागी आहेत. आम्हाला कंपन्यांबद्दल माहिती आहे. परंतु, त्यांच्या कार्याबद्दल किंवा आर्थिक स्थितीबद्दल कोणतीही माहिती नाही. खेडकरांना आपण ओळखतो. आमची नावं कंपन्यांमध्ये आहेत, कारण त्यांनी आम्हाला विनंती केली होती. आकाश हा ओम दीप शुगर अँड ॲग्रो प्रायव्हेट लिमिटेडमध्ये शेअरहोल्डर आहे. ही कंपनी पुण्यातील सदानंद अपार्टमेंटमध्ये नोंदणीकृत असून ती मनोरमाच्या नावावर आहे. या पत्त्यावर इतर दोन डिलिजन्स कंपन्याही नोंदणीकृत होत्या. चौथ्या ड्यू डिलिजन्स कंपनीमध्ये, पुण्यातील चंद्रलोक अपार्टमेंटमधील मनोरमा यांच्या मालकीच्या दुकानाचा पत्ता वापरण्यात आला आहे.
Even if we assume that #PujaKhedkar's mother, Manorama, was separated from Dilip Khedkar since 2003, she was ineligible for a #NonCreamyLayer (NCL) certificate. She possessed significant properties including 16,000 https://t.co/VbEak3sJKq of commercial property (1995-2005), a… pic.twitter.com/YGJNsp9dK7
— Vijay Kumbhar (@VijayKumbhar62) July 24, 2024