Dry Ice Gurgaon : गुरूग्राम येथील एका रेस्टॉरंट मध्ये एक धक्कादायक प्रकार ( Dry Ice Gurgaon) समोर आला. ज्यामध्ये माऊथ फ्रेशनरच्या ऐवजी ड्राय आईसच्या सेवनाने पाच लोकांना थेट रक्ताच्या उलट्या झाल्या. त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. तसेच येथील दोघांची प्रकृती अत्यंत गंभीर आहे. मात्र हा ड्राय आइस म्हणजे काय? त्याचे नेमके काय दुष्परिणाम होतात? जाणून घेऊ सविस्तर…
निलेश लंकेंनी लवकरात लवकर निर्णय घ्यावा; कोल्हेंचं मंचावरूनच सूचक विधान
नेमकं प्रकरण काय?
गुरुग्राम या ठिकाणी एक मित्रपरिवार एका रेस्टॉरंटमध्ये जेवणासाठी गेला होता. त्यावेळी जेवणानंतर तेथील वेटरने चुकून त्यांना माऊथ फ्रेशनर ऐवजी ड्राय आईस दिला. या ड्राय आईसच्या सेवनाने या ग्राहकांच्या तोंडाची भयंकर आग झाली, त्यानंतर तोंडातून रक्त येऊ लागलं. तसेच काहींना उलटीचा त्रास झाला. तर काहींची प्रकृती गंभीर झाली. त्यावेळी तात्काळ त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. रुग्णालयात गेल्यानंतर हे स्पष्ट झालं की, या लोकांनी माऊथ फ्रेशन ऐवजी ड्राय आईसचं सेवन केलं होतं. त्यामुळे त्यांच्यावर ही परिस्थिती ओढावली.
न्यायमूर्ती अभिजित गंगोपाध्याय यांचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश करणार, मतदारसंघही फायनल
ड्राय आईस म्हणजे काय?
ड्राय आईसहा एक प्रकारचा कोरडा बर्फ आहे. ज्याचं तापमान तब्बल मायनस 80 डिग्री असतं. हा बर्फ केवळ कार्बन डाय-ऑक्साइड पासून बनवलेला असतो. ज्याप्रमाणे सामान्य बर्फ तोंडात टाकतात विरघळतो. मात्र हा ड्राय आईस विरघळताना कार्बन डाय-ऑक्साइड बनतो. अत्यंत कमी तापमान असल्याने या ड्राय आइसचा वापर साधारणपणे किराणा तसेच औषधांच्या जतनासाठी केला जातो. तसेच फोटोशूट आणि थेटरमध्ये देखील त्याचा वापर केला जातो.
T20 WORLD CUP: भारत-पाकिस्तान महामुकाबला, एका तिकिटासाठी मोजावे लागतायत 1.86 कोटी
नेमके काय दुष्परिणाम होतात?
ड्राय आईस एखाद्या बंद खोलीमध्ये जिथे व्हेंटिलेशन नाही. तिथे ठेवल्यास त्यातील कार्बन डाय-ऑक्साइड वातावरणात पसरून जीव गुदमरणे, डोकेदुखी, श्वास घ्यायला त्रास होणे, थरकाप होणे, कानामध्ये सुन्न आवाज येणे, ओठ आणि नखं पिवळे पडणे. यासारख्या समस्या निर्माण होऊ शकतात. जास्त काळापर्यंत ड्राय आईसचा वापर केल्यास फ्रॉस्टबाईट आणि त्वचेला नुकसान होऊ शकते. त्याचबरोबर ड्राय आईसचे सेवन केल्याने तो विरघळताना कार्बन डाय-ऑक्साइडमध्ये रूपांतरित होईल. ज्यामुळे तोंडातील स्नायू आणि पेशींचा मोठं नुकसान होतं. अशा घटनांमध्ये एखाद्या व्यक्ती बेशुद्ध होऊ शकतो किंवा गंभीर परिणाम झाल्यास मृत्यू देखील होऊ शकतो.
ड्राय आईस हाताळताना काय काळजी घ्यावी?
त्यामुळे ड्राय आईसचं सेवनच नाही तर स्किनपासून देखील तो दूर ठेवला पाहिजे. त्याला हाताळताना एखाद्या कपड्यांमध्ये गुंडाळून हाताळायला हवा. अन्यथा त्वचेच्या संपर्कात येतात रक्तस्राव सुरू होऊ शकतो. त्यामुळे त्याचा वापर काळजीपूर्वकाने मोकळ्या वातावरणात करायला हवा.