Download App

दिल्ली-एनसीआरमध्ये भूकंपाचे धक्के, नागरिकांमध्ये भितीचे वातावरण

  • Written By: Last Updated:

Earthquake : दिल्ली-एनसीआरमध्ये आज (5 ऑगस्ट) रात्री उशिरा भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता 5.8 इतकी होती. रात्री उशिरा 9.34 मिनिटांनी हे धक्के जाणवले. जम्मू-काश्मीरमधील गुलमर्ग येथे भूकंपाचा केंद्रबिंदू होता.

भूकंपाचे धक्के केवळ दिल्ली-एनसीआरमध्येच नव्हे तर आसपासच्या भागातही जाणवले. अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमधील इस्लामाबाद, लाहोर, पेशावर भागात भूकंप झाला आहे. मात्र, आतापर्यंत कुठूनही नुकसान झाल्याची माहिती समोर आलेली नाही.

याआधी, आज पहाटे जम्मू-काश्मीरमधील गुलमर्गमध्ये 5.2 रिश्टर स्केलचा भूकंप झाला होता. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने (एनसीएस) सकाळी 8:36 वाजता भूकंपाचे धक्के बसल्याची माहिती दिली. भूकंपाचा केंद्रबिंदू गुलमर्गपासून 184 किमी अंतरावर पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 129 किमी खाली होता. अहवालांनुसार, या वर्षी जूनपासून जम्मू-काश्मीरमध्ये वेगवेगळ्या तीव्रतेचे 12 धक्के बसले आहेत. यापूर्वी, 10 जुलै रोजी सकाळी जम्मू-काश्मीरच्या डोडा जिल्ह्यात 4.9 तीव्रतेचा भूकंप झाला होता.

पनवेल-नांदेड ट्रेन प्रवाशांनी रोखली, झुरळांचा बंदोबस्त केला तरच ट्रेन पुढे जाऊ देणार

दिल्लीत मोठ्या भूकंपाचा धोका का?
दिल्लीत मोठा भूकंप होण्याची शक्यता बऱ्याच दिवसांपासून वर्तवली जात आहे. राजधानीत मोठ्या तीव्रतेचा भूकंप होऊ शकतो, असे तज्ज्ञांचे मत आहे. वास्तविक दिल्ली हे भूकंपाच्या झोनपैकी झोन ​​4 मध्ये आहे. देश अशा चार झोनमध्ये विभागलेला आहे. झोन-4 मध्ये असल्याने दिल्ली भूकंपाचे जोरदार धक्केही सहन करू शकत नाही.

भाजप खासदाराला दोन वर्षांची शिक्षा, खासदारकी जाऊ शकते

दिल्ली हिमालयाजवळ आहे जी भारत आणि युरेशिया सारख्या टेक्टोनिक प्लेट्सच्या मिलनातून तयार झाली आहे. पृथ्वीच्या आत या प्लेट्सच्या हालचालींमुळे दिल्ली, कानपूर आणि लखनौसारख्या भागात भूकंपाचा धोका सर्वाधिक आहे.

Tags

follow us