Download App

EPFO ची कर्मचाऱ्यांना मोठी भेट! आता चेहऱ्यावरुन जनरेट होणार UAN; केंद्रीय मंत्री मांडवियांची घोषणा

आता चेहरा दाखवून कर्मचाऱ्यांना युएएन नंबर तयार करता येणार असल्याची घोषणा ईपीएफओकडून करण्यात आलीयं.

Epfo new service now members can generate uan through face authentication know how it will work : आता कर्मचारी भविष्य निर्वाह निधीसाठी (EPFO) कर्मचाऱ्यांचा चेहरा हीच त्यांची ओळख असणार आहे. UAN नंबर तयार करण्यासाठी आता कोणताही कागद लागणार नसून कर्मचाऱ्याच्या चेहरा दाखवल्यानंतर लगेचच UAN नंबरचा टेक्स मेसेज EPFO कडून प्राप्त होणार आहेत. केंद्रीय रोजगार मंत्री मनसुख मांडविया यांनी याबाबतची घोषणा केलीयं.

धक्कादायक! नाइटक्लबचे छत अचानक कोसळून 66 जणांचा मृत्यू; घटनेचा थरारक Video पाहा..

केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया म्हणाले, आता कर्मचाऱ्यांचा चेहराच ओळख असणार आहे. UAN नंबर तयार करण्यासाठी आता कोणत्याही कागदपत्रांची आवश्यकत नसून उमंग अॅपद्वारे चेहरा दाखवून UAN नंबर मेसेजच्या माध्यमातून मिळणार असल्याचं मांडविया यांनी सांगितलंय.

चेहऱ्याच्या ओळखीसह कर्मचाऱ्याला आधार कार्डचा नंबर अथवा आधार कार्ड आवश्यक असणार आहे. ही प्रक्रिया कर्मचारी उमंग अॅपच्या माध्यमातून करु शकणार असून तपासणीनंतर कर्मचाऱ्यांना युएएन नंबर देण्यात येणार आहे. ज्या कर्मचाऱ्यांकडे युएएन नंबर आहे, मात्र, अॅक्टीव नाही अशा कर्मचाऱ्यांना या सुलभ प्रक्रियेचा फायदा होणार आहे.

व्यापार युद्ध भडकणार! अमेरिकेकडून चीनवर मोठा टॅरिफ बॉम्ब; 9 एप्रिलपासून 104 टक्के आयात शुल्क

फायदे काय?
उमंग अॅपमध्ये चेहरा दाखवल्यानंतर युएएन नंबरसाठी याआधीसारख्या कागदपत्रांची गरज भासणार नाही. पुढील काळात या अॅपमध्ये या व्यतिरिक्त अनेक पर्याय खुले होणार असून कर्मचाऱ्यांना पीएफ कार्यालयात जाण्याची आवश्यक भासणार नाही. पेन्शनधारकांसाठीदेखील लवकरात लवकर डिजीटल जीवन प्रमाणपत्राची सुविधा सुरु करण्यात येणार आहे.

follow us