Download App

Jaipur Gas Leakage : मोठी बातमी! जयपूरमध्ये गॅस गळती, अग्निशमन दल घटनास्थळी दाखल

Jaipur Gas Leakage  :  एक मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार राजस्थानची (Rajasthan) राजधानी जयपूरमध्ये (Jaipur) गॅस गळती

  • Written By: Last Updated:

Jaipur Gas Leakage  :  एक मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार राजस्थानची (Rajasthan) राजधानी जयपूरमध्ये (Jaipur) गॅस गळती झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे आजूबाजूच्या परिसरात धूर पसरली असून नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.

या घटनेची माहिती मिळताच सिव्हील डिफेन्स (Civil Defense) , पोलीस (Police) आणि अग्निशमन दलाचे (Fire Brigade) पथक घटनास्थळी दाखल झाले असून रेस्क्यू ऑपरेशन सुरु झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील विश्वकर्मा भागातील रोड नंबर 18 वर असलेल्या गॅस फिलिंग प्लांटमध्ये गॅस गळती झाली आहे. प्लांटच्या टाक्या कार्बन डायऑक्साइड (CO2) वायूने भरल्याचं सांगण्यात येत आहे. त्यातून गळती सुरू झाली आणि आजूबाजू धूर पसरली.

सिव्हील डिफेन्सच्या घटनास्थळी पोहोचलेल्या पथकाने टाकीचा व्हॉल्व्ह बंद केला आणि त्यानंतरच गॅसची गळती थांबली. पथकाने टाक्यांचे व्हॉल्व्ह बंद केले होते, मात्र तोपर्यंत मोठ्या प्रमाणात गॅसची गळती झाली होती. त्यामुळे आजूबाजूची पार्क केलेली वाहने, घरे, इमारती, रस्ते, झाडे, झाडे यांच्यावर पांढरी चादर तयार झाली होती.

वाल्मिक कराड पांढऱ्या स्कॉर्पिओतून आला… ‘ती’ गाडी नेमकी कोणाची? वाचा A टू Z माहिती

माहितीनुसार, दुर्घटनेत सुदैवाने कोणतीही मनुष्यहानी झालेली नाही. काही दिवसापूर्वी अजमेर हायवेवर भांकरोटा जवळ गॅस टँकर दुर्घटनेमध्ये  20 जणांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे लोकांमध्ये दहशत निर्माण झाली होती.

I Am Sorry… अखेर मुख्यमंत्र्यांनी मागितली माफी, म्हणाले, संपूर्ण वर्ष…

follow us

संबंधित बातम्या