CM शिंदेंच्या ‘त्या’ विधानावर राज ठाकरेंची मिश्किल टिप्पणी, म्हणाले, ‘लावा बांबू…’
Raj Thackeray : ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यात रोज टीकेच्या फैरी झडत आहेत. काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर जोरदार टीका केली होती. काही लोकांना बांबू लावला पाहिजे, असं विधान मुख्यमंत्री शिदेंनी केलं होतं. त्यावर आता मनसे प्रमुख राज ठाकरेंनी भाष्य केलं.
Akshay Kumar: खिलाडी कुमारच्या ‘सरफिरा’ सिनेमातील पहिले धमाकेदार ‘मार उदी’ गाणे प्रदर्शित
विधासभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांच्या उपस्थितीत आज मनसे पदाधिकाऱ्यांची मुंबईत बैठक झाली. या बैठकीनंतर माध्यमांशी बोलतांना राज ठाकरेंनी अनेक विषयांवर भाष्य केलं. यावेळी त्यांना मुख्यमंत्री शिंदेंनी केलेल्या वक्तव्याविषयी विचारले असता मग लावा म्हणा, असं मश्किल उत्तर राज ठाकरे यांनी दिलं.
दरम्यान, एकीकडे उद्धव ठाकरे यांनी जाहीर सभेत राज ठाकरे यांना ‘बिनशर्ट’ पाठिंबा म्हणत टीका केली असताना दुसरीकडे आदित्य ठाकरे यांनीही मनसेला ‘सुपारीबाज पक्ष’ म्हणत टोला लगावला होता. याविषयी विचारले असताच राज ठाकरेंनी हा प्रश्न प्रश्न पूर्ण होण्याआधीच लागलीच ठीक आहे, पुढचा प्रश्न घ्या, असं म्हणत या टीकेला फारसं महत्व देत नसल्याचं दर्शवलं.
शर्वरी वाघ ठरली Munjya चा सर्वात मोठा सरप्राईज फॅक्टर; म्हणाली मला खूप…
यावेळी बोलतांना राज ठाकरेंनी मराठा-ओबीसीवादावरही भाष्य केलं. ते म्हणाले की, या जातीच्या वादातून काही निष्पन्न होणार नाही, हे मी गेली अनेक वर्षे संपूर्ण समाजाला सांगत आलो आहे. हे सर्व नेते जातीजातींमध्ये द्वेष पसरवतील आणि फक्त मते घेतील. काल मला कुणीतरी एक क्लिप पाठवली ज्यात लहान लहान मुलं जातींवर बोलत हती. मी फार पूर्वीच म्हणालो होतो की, हे जातीपातीचं विष शाळा-कॉलेजपर्यत जाईल. जातीपातीचं विष कालवणाऱ्यांना महाराष्ट्रानं दूर ठेवलं पाहिजे, असंही राज ठाकरे म्हणाले.
शिंदे नेमकं काय म्हणाले?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज एका कार्यक्रमात बांबूचे महत्व पटवून देतांना राऊत यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली. ते म्हणाले, बांबू हा ऑक्सिजन अधिक देणारा आणि कार्बन डायऑक्साइड अधिक प्रमाणात शोषून घेणारा आहे. बांबूचे एवढे बायो प्रॉडक्ट आहेत की, आपण विचारही करू शकणार नाही. त्यामुळे बांबूची लागवड मोठ्या प्रमाणात केली पाहिजे. तसेच काही लोकांना बांबूही लावायला पाहिजे. काही लोक असे असतात जे सकाळीच भोंगा वाजवतात, असा चिमटी शिदेंनी काढला होता.