भीषण! जयपूरमध्ये केमिकल टँकरच्या स्फोटात ५ जण जिवंत जळाले; २० वाहनांना आग, ३० जण होरपळले

भीषण! जयपूरमध्ये केमिकल टँकरच्या स्फोटात ५ जण जिवंत जळाले; २० वाहनांना आग, ३० जण होरपळले

Jaipur Accident : राजस्थानातील जयपूर शहरात धक्कादायक घटना घडली आहे. शहरातील पेट्रोल पंपाजवळ LPG आणि CNG ट्रक यांच्यात जोरदार धडक झाली. या दुर्घटनेत अनेक वाहनांना आग लागली. तसेच पाच लोकांचा या आगीत होरपळून मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस दल आणि अग्निशामकव वाहनांनी घटनास्थळी धाव घेतली. तत्काळ मदत कार्य सुरू करण्यात आले. सध्या या ठिकाणी २० अग्निशामन वाहने तैनात केली असून आग आटोक्यात आणली जात आहे. या दुर्घटनेनंतर सुरक्षेचा विचार करून आसपासचा रस्ता डायवर्ट करण्यात आला आहे. घटनास्थळी अनेक वाहने जळून खाक झाली आहेत.

मुंबई बोट अपघातात 13 जणांचा मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत; CM फडणवीसांची घोषणा 

पाच जण जिवंत जळाले

मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही वाहने एकमेकांना धडकल्यानंतर येथील २० वाहने आगीच्या विळख्यात सापडली. या आगीत पाच जणांचा होरपळून मृत्यू झाला. टँकरमध्ये ब्लास्ट झाल्यानंतर ५०० मीटर परिसरात केमिकल पसरले गेले. यामुळे आगीचा फैलाव वाढून आसपास असलेल्या वाहनांना देखील आग लागली. येथील एक कारखाना सुद्धा या आगीच्या विळख्यात सापडला.

केमिकल आणि गॅसमुळे आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन विभागाला अडचणी येत आहेत. रेस्क्यू टीमचे सदस्य तोंडाला मास्क लावून आग नियंत्रणात आणण्याचे काम करत आहेत. आज सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास भांकरोटा परिसरात जोरदार स्फोट झाल्याचा आवाज ऐकू आला. त्यामुळे लोक भयभीत झाले. केमिकल घेऊन जाणारे टँकरचा स्फोट झाल्याचे नंतर लक्षात आले. परंतु, तोपर्यंत आग दूरवर पसरली होती.

या घटनेची माहिती देताना जयपूरचे डीएम जितेंद्र सोनी म्हणाले, जवळपास ४० वाहनांना आग लागली आहे. फायर ब्रिगेड आणि रुग्णवाहिका या ठिकाणी दाखल झाल्या आहेत. मदतकार्य वेगाने सुरू आहे. आता आग आटोक्यात आली आहे. या दुर्घटनेत फक्त एक ते दोन वाहने वाचविता आली आहेत. बाकी वाहने जळून खाक झाली आहेत. या घटनेत जवळपास २३ ते २४ लोक जखमी झाले आहेत. या जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दोन ट्रकची एकमेकांना जोरदार धडक बसल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. या धडकेमुळे परिसरातील वाहनांना देखील आग लागली. याबाबत अद्याप खात्रीशीर माहिती उपलब्ध झालेली नाही. पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला आहे. पोलिसांच्या तपासातून या घटनेमागे नेमके काय कारण होते, कशामुळे आग लागली या प्रश्नांचं उत्तर मिळणार आहे.

मोठी बातमी! डोंगरीत इमारतीला भीषण आग, अनेक लोक अडकले

follow us
  • fb
  • instagram
  • youtube