नवी दिल्ली : काश्मीरमधील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) च्या 30 नेत्यांना आंतकवादी संघटनेकडून धमकी देण्यात आल्याची माहिती समोर आलीय. ही धमकी आतंकवाद्यांच्या ‘द रेसिसटेंस फ्रंट’ या संघटनेकडून देण्यात आल्याचं समोर आलंय.
Maharashtra Politics : हर्षवर्धन पाटील हे दत्तात्रय भरणेंना घाबरले का?
या संघटनेला पाकिस्तानमधील ‘लश्कर-ए-तोयबा’ या संघटनेचं समर्थन आहे. या वृत्ताला जम्मू-काश्मीरमधील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दुजोरा दिला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या माहितीनूसार आंतकवाद्यांच्या निशाण्यावर विशेषत: जे मुस्लिम नेते आरएसएससाठी काम करीत ते आहेत.
मंत्रालयासमोर विषप्राशन करणाऱ्या संगीता डवरे यांचा उपचारादरम्यान मृत्यू
दरम्यान, नूकत्याच आलेल्या धमकीप्रकरणी तपास सुरु असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय. तसेच आतंकवाद्यांकडून सोशल मीडियाचा वापर एका हत्यारासारखा वापर होत असल्याचा प्रोपोगंडा पसरविला जात आहे. ज्या नेत्यांना धमकी आलीय त्यामध्ये एकाही मोठ्या नेत्याचं नाव नसून जम्मू-काश्मीर प्रशासनाच्या जवळच्या नागरिकांना टार्गेट केलं जात असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय.
‘महाराष्ट्र्र शाहीर’च्या गाण्याने पार केला 1 मिलियन्सचा टप्पा, पाहा पडद्यामागची कहाणी
आरएसएसचे प्रमुख मोहन भागवत यांनी क्रांतिकारी हेमू कलानी यांच्या जयंतीच्या कार्यक्रमात केलेल्या विधानामुळेच आतंकवाद्यांकडून धमकी आल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पाकिस्तानातील लोकं खुश नसून पाकिस्तानातील लोकांसाठी देशाची फाळणी एक चूक झाल्याचं मानलं जातंय.
नगर-कल्याण महामार्गावर भीषण अपघात, पाच जणांचा जागीच मृत्यू
भारताच्या फाळणीनंतर लोकं खुश आहेत का? असा सवाल उपस्थित करीत त्यांनी तिथं फक्त दर्द असल्याचं म्हटलं होतं. दरम्यान, आतंकवाद्यांकडून आलेली धमकी ही आरएसएसचे मोहन भागवतांच्या वक्तव्यामुळेच आली असल्याचं बोललं जात असून धमकी प्रकरणी केंद्र सरकारकडून ठोस पाऊले उचलली जात आहेत. धमकीचा अधिक तपास सुरु असल्याचंही सांगण्यात येत आहे.