नगर-कल्याण महामार्गावर भीषण अपघात, पाच जणांचा जागीच मृत्यू

  • Written By: Published:
Httpswww.canva.comdesignDAFcJmY7 AA2pbVhvfb_idY9UrtjK05lwviewium=link&utm_source=shareyourdesignpanel (21)

पुणे : पुण्यातील (PUNE NEWS) जुन्नर तालुक्यात भीषण अपघात झाला आहे. अहमदनगर-कल्याण महामार्गावर (Ahmednagar-Kalyan highway) माळशेज घाटाजवळ इनोव्हा आणि पिकअप कारची समोरासमोर धडक (Accident) झाली आहे. यात पाच प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे तर दोन प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.

सोमवारी रात्री नऊच्या सुमारास वाटखळ गावाजवळ हा भीषण अपघात झाला आहे. इनोव्हाच्या चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने समोरून येणाऱ्या पिकअप जीपला तिने जोरात धडक दिली आहे. मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरु आहे.

हार्ट अ‍टॅकचा कोरोनाशी संबंध आहे का? पाहा आरोग्य मंत्री काय म्हणाले

इनोव्हा गाडी ही कल्याणकडून आळेफाटाकडे चालली होती तर पिकअप कल्याणच्या दिशेने चालला होता. रात्री 9 वाजता माळशेज घाट परिसरात असणाऱ्या वाटखळ गावाजवळ पिकअप आणि इनोव्हा गाडीची समोरासमोर धडक झाली. इनोव्हा गाडीच्या चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती आहे.

या अपघातामुळे जुन्नरमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे. पाच जणांचा जागीच मृत्यू झाल्यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. या अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले होते. त्यांनी वाहनात अडकलेले मृतदेह बाहेर काढले आहेत. मृतांची नावे अद्याप समोर आली नसून इनोव्हा गाडी ही कल्याणकडून आळेफाट्याकडे चालली होती दरम्यान हा अपघात झाला.

Tags

follow us