तुम्हाला काय सावरकर कळणार, तुम्ही तर नकली गांधी, फडणवीसांनी राहुल गांधींना सुनावले

  • Written By: Published:
Eb8c8b63 9c2a 402f Bebc 86d893b8d58d 202206835206_202211444418

मुंबई : तुम्ही सावरकर नाहीत आणि गांधी नाहीत. नकली आडनाव घेऊन आला आहात तुम्हाला माहिती पाहिजे लोकसभेत बंगालच्या एका खासदाराने सावरकरांच्या गौरवाचा प्रस्ताव आणला होता तेव्हा काँग्रेसने त्याला विरोध केला होता. परंतु त्या प्रस्तावाला तुमचे आजोबा फिरोज गांधी यांनी पाठिंबा दिला होता. पण तुम्हाला तुम्हाला काय सावरकर कळणार, तुम्ही तर नकली गांधी आहात. देवेंद्र फडणवीस यांणी राहुल गांधींना सुनावले. ते मुंबईतील कांदिवली येथे आयोजित स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बोलत होते.

सावरकरांचा गौरव आमच्या मनात आहे, सावरकर पिढयांपिढ्या आम्हाला प्रेरित करतील, परंतु आम्हाला सावरकरांचा पुन्हा गौरव करण्यासाठी रस्त्यावर उतरावं लागलं कारण या देशामध्ये सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आले, परंतु त्यांना भारताचा इतिहास माहित नाही आणि भारताचा वर्तमान ही माहिती नाही. ज्यांना भारताचे देशभक्त माहिती नाही. त्यांचा पक्ष चीनच्या पैशावर उभा राहतो. असे लोक आज सावरकरांना शिव्या शाप देतात त्यांना माफीवीर म्हणतात त्यावेळी खऱ्या अर्थाने देशभक्तान रस्त्यावर उतरावं लागत आणि सांगावं लागत होय मीच सावरकर आहे.

रिक्षावाला विधानावरून, अरविंद सावंतांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन 

सावरकरच खरे देशभक्त आहेत. तुम्ही तर या देशात पोसले गेलेले राजकारणी आहात. राहुल गांधी तुम्ही कधीच सावरकर होऊ शकत नाहीत. सावरकर होण्याची औकात आणि लायकी काँग्रेसमध्ये कोणातच नाही. सावरकर होण्यासाठी त्याग लागतो तप लागतो. देशासाठी तुरुंगाच्या काल कोठडीत राहावं लागत. अशा परखड शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधींवर टीका केली.

मुंबईतील कांदिवली येथे आयोजित स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बोलत
होते. प्रवीण दरेकर, आनंदराव अडसूळ, योगेश सागर, मनिषाताई चौधरी, सुनील राणे, अमित साटम आदी उपस्थित आहेत.

Tags

follow us