Download App

हॅलो ‘आयरिस’ मॅडम! आता केरळच्या विद्यार्थ्यांना शिकवणार पहिली एआय शिक्षिका; काय आहे खासियत?

  • Written By: Last Updated:

India’s First AI Teacher : आर्टिफिशियल इंटेलिजन्स (Artificial Intelligence) हा हल्ली कायच विषय झाला आहे. एआय हा अलीकडे तंत्रज्ञानातील सर्वात लोकप्रिय ट्रेंड बनला. एआयने आपल्या जीवनातील विविध गोष्टींमध्ये प्रवेश केला. दरम्यान, आता याच तंत्रज्ञानाच्या साहाय्याने केरळमधील एका स्कूलने कोणीही कल्पना केली नसेल अशी गोष्ट केली. आता एआय शिक्षिका केरळमधील शाळेत विद्यार्थ्यांना शिकवणार आहेत. आयरिस (Iris) असे या AI शिक्षकाचे नाव आहे.

Baramati Loksabha : जनतेचा जोर; सुनेत्रा पवारांचाही दुजोरा, नणंद-भावजयी आमने-सामने 

केरळमधील तिरुअनंतपुरम येथील एका शाळेत AI शिक्षिका आयरिसचे आगमन झाले. हे शिक्षण क्षेत्रातील क्रांतिकारी पाऊल समजले जातेय. MakerLabs EduTech या कंपनीच्या सहकार्याने विकसित केलेली आयरिस ही राज्यातील आणि शक्यतो देशातील पहिली मानवीय रोबो शिक्षक आहे. आयरिस ही एक ह्युमनॉईड रबो आहे. तिचं बाह्यरंग, रुप हे मानवीय असलं तरी ती एआय रोबोट आहे.

Aditi Bhatia : अभिनय सोडून अदिती भाटिया अमेरिकेत काय करते? 

कडुवायिल थंगल चॅरिटेबल ट्रस्टच्या पुढाकाराने केटीसीटी हायर सेकेंडरी स्कूलमध्ये ही आयरिस रोबो शिक्षिका शिक्षणाचे धडे देणार आहे. आयरिस हा अटल टिंकरिंग लॅब (ATL) प्रकल्पाचा एक भाग आहे, 2021 चा NITI आयोग उपक्रम आहे जो शाळांमध्ये अभ्यास आणि इततर कार्यशाळांना चालना देण्यासाठी डिजाईन केला.

दरम्या, मेकरलॅब्सने इंस्टाग्रामवर आयरिसचा एक व्हिडिओ शेअर केला. या शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये या बहुभाषिक एआय शिक्षिकेची क्षमता दिसून येते. मेकरलॅब्सने लिहिलं की, आयरिस विविध विषयांवरील जटिल प्रश्नांची उत्तरे देऊ शकते, वैयक्तिक आवाज सहाय्य देऊ शकते आणि परस्परसंवादी शिक्षण अनुभव सुलभ करू शकते.

आयरिस तीन भाषा बोलू शकते आणि कठीण प्रश्नांची उत्तरेही देऊ शकते. दरम्यान, पोस्टच्या कॅप्शनमध्ये असे लिहिले आहे की, ‘इनोव्हेशनमध्ये आघाडीवर राहून, मेकरलॅब्स एज्युटेकला त्यांची नवीनतम निर्मिती ‘आयरिस – एआय टीचर रोबोट’ सादर करताना अभिमान वाटतो

आयरिस हे ‘रोबोटिक्स आणि जनरेटिव्ह एआय’ चे संयोजन आहे. सध्या त्यांची ही इन्स्टाग्राम पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली असून नेटिझन्सही त्यावर आपल्या प्रतिक्रिया देत आहेत.

एआय रोबोट शिक्षकांची संख्या वाढवण्याचा विचार –

शाळेच्या मुख्याध्यापिका मीरा एमएन यांच्या मते, पहिल्या AI शिक्षिकेला विद्यार्थ्यांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. आता 3000 पेक्षा जास्त विद्यार्थी असलेली ही शाळा पुढील शैक्षणिक सत्रात जेनेरिक AI रोबोट शिक्षकांची संख्या वाढवण्याचा विचार करत आहे, असं त्या म्हणाल्या.

follow us