RG Kar Medical College Case : कोलकात्यातील आरजी कर मेडिकल कॉलेज (RG Kar Medical College Case) बलात्कार आणि हत्या प्रकरणात न्यायालयाने मोठा निर्णय देत मुख्य आरोपी संजय रॉयला (Sanjay Roy) दोषी ठरवले आहे. तर या प्रकरणात आता सोमवारी शिक्षा देण्यात येणार आल्याची माहिती न्यायालयाने दिली आहे. पश्चिम बंगालच्या सियालदाह न्यायालयाने (Sealdah Court) शनिवारी हा निकाल दिला.
आज झालेल्या सुनावणीत आरोपी संजय रॉयने सांगितले की, मला या प्रकरणात अडकवण्यात येत आहे. मी ते केलेले नाही. ज्यांनी केले आहे त्यांना सोडण्यात आले आहे आणि या प्रकरणात एका आपीएस अधिकाऱ्याचा सहभाग आहे. असं सुनावणीदरम्यान आरोपी संजय रॉय म्हणाला.
संजय रॉयविरुद्ध बीएनएस कलम 64,66, 103/1 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीविरुद्ध तक्रार आहे की तो आरजी कर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये गेला आणि सेमिनार रूममध्ये महिला डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या केली असं न्यायालयाने सांगितले.
प्रकरण काय?
9 ऑगस्ट 2024 रोजी कोलकाता पोलिसांनी आरोपी संजय रॉयवर महिला डॉक्टरवर बलात्कार करून हत्या केली असा आरोप केला होता. या प्रकरणात सुनावणी 12 नोव्हेंबर रोजी सुरू झाली होती. तर आता 57 दिवसांनंतर सियालदाह न्यायालयाने या प्रकरणात निर्णय देत मुख्य आरोपी संजय रॉयला दोषी ठरवले आहे. आरोपी संजय रॉयला कोलकाता पोलिसांनी 10 ऑगस्ट रोजी अटक केली होती. तर 9 ऑगस्ट रोजी रुग्णालयाच्या सेमिनार रूममधून डॉक्टरचा मृतदेह सापडला होता. यानंतर कोलकाता उच्च न्यायालयाने हे प्रकरण सीबीआयकडे सोपवले होते.
इंग्लंडविरुद्धच्या ODI मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा, सिराजला डच्चू, तर गिलकडे उपकर्णधार पद
तर दुसरीकडे या प्रकरणात इतर आरोपींचा सहभाग होता असा दावा पीडितेच्या पालकांनी केला आहे. त्यांना देखील अटक करण्यात यावी अशी मागणी देखील त्यांच्याकडून करण्यात आली आहे. तसेच त्यांनी या प्रकरणात पुढील चौकशी करण्यात यावे या मागणीसाठी उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला आहे.