Download App

Madhya Pradesh Cabinet : मोदी-शाहांचा पुन्हा धक्का! चौहान-सिंधियांचे खास नेते मंत्रिमंडळातून बाहेर…

  • Written By: Last Updated:

Madhya Pradesh Cabinet : मध्यप्रदेशमध्ये विधानसभा (Madhya Pradesh Cabinet ) निवडणुका पार पडल्यानंतर मोदी आणि शाह यांच्या रणनीतीचा पहिला धक्का बसला तो म्हणजे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांना. त्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार करताना मोदी आणि शाह यांनी चव्हाण यांच्यासह ज्योतिरादित्य सिंधिया यांना देखील धक्का दिला आहे.

Shirur Loksabha : शिरुरची जागा अजितदादांकडे गेल्यास आढळराव काय करणार?

हा धक्का म्हणजे मध्य प्रदेश मध्ये मंत्रिमंडळ विस्तार करण्यात आला त्यामध्ये 28 मंत्र्यांनी शपथ घेतली यामध्ये नवनवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आले मात्र अनेक मोठ्या नेत्यांना यामध्ये डावलण्यात आल्याचे दिसून आलं. यामध्ये मुख्यमंत्री म्हणून नाकारण्यात आलेल्या शिवराज सिंह चौहान यांच्या निकटवर्ती यांना आणि दिग्गज नेत्यांना देखील संधी मिळालेली नाही.

Ajit Pawar यांना बालेकिल्ल्यातच धक्का! लोकसभेला उमेदवारी न दिल्याने कट्टर समर्थक मातोश्रीवर

ज्यामध्ये भूपेंद्र सिंह जे शिवराज सिंग चौहान यांच्या मंत्रिमंडळात महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी सांभाळत होते. त्यांनाही संधी मिळालेली नाही. तसेच अर्थमंत्री राहिलेले जयंत मैलया हे देखील आता केवळ एक आमदार आहेत. तसेच मध्य प्रदेशचे सर्वात ज्येष्ठ आमदार आणि विधानसभेचे अध्यक्ष गोपाल भार्गव यांच्या देखील हाती निराशा आली आहे. कारण एकीकडे ते मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत असताना त्यांच्या हाती एकही मंत्रीपद आलेले नाही. तसेच माजी विधानसभा अध्यक्ष गिरीश गौतम, रामेश्वर शर्मा खासदारकीहून आमदारकी मिळवणाऱ्या रिती पाठक या सर्वांच्या हाती निराशा आली आहे.

तर दुसरीकडे काँग्रेसमधून भाजपामध्ये आलेल्या ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या गटातील नेत्यांमध्ये देखील नाराजी आहे. कारण सिंधिया यांचे समर्थक असलेले माजी मंत्री संजय पाठक, प्रभू राम चौधरी, उषा ठाकूर यासारख्या दिग्गजांचा देखील पत्ता कट करण्यात आला आहे. त्यामुळे मोदी आणि शाह यांनी राजस्थान, छत्तीसगड आणि मध्यप्रदेशच्या मुख्यमंत्रीपदानंतर आता मध्यप्रदेशच्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये देखील दिग्गजांना धक्का देत नवे चेहरे समोर आणले आहेत.

Tags

follow us