Haryana Accident : हरियाणातील अंबाला येथे आज सकाळी भीषण (Haryana Accident) अपघात झाला. उत्तर प्रदेशातील बुलंदशहर येथून वैष्णोदेवीच्या दर्शनसाठी निघालेल्या टेम्पो ट्रॅव्हलर आणि ट्रेलर यांच्यात जोरात धडक झाली. या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील सात जणांचा जागीच मृत्यू झाला. तर वीसपेक्षा जास्त प्रवासी जखमी झाले. ही घटना अंबाला-दिल्ली राष्ट्रीय महामार्गावरील मोहाजवळ घडली. दोन्ही वाहनांची धडक इतकी जोरदार होती की टेम्पो ट्रॅव्हलर अर्धा चेपली गेली. मयतांमध्ये सहा महिन्यांच्या चिमुकलीचा समावेश आहे. अपघातातील जखमी प्रवासी रस्त्यावर इकडेतिकडे फेकले गेले होते. तर काही जखमी प्रवासी बसमध्येच अडकून पडले होते.
या रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांनी जखमींना मदत केली. या घटनेची माहिती मिळताच पोलीसही घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी नागरिकांच्या मदतीने जखमींना बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले. या अपघातातील काही जखमी प्रवाशांची प्रकृती गंभीर आहे त्यामुळे मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अपघात झाल्याने रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला घेत वाहतूक सुरळीत केली.
मोठी बातमी! पुणे पोर्श अपघात प्रकरणी पोलिसांचीही चौकशी होणार, आयुक्तांनी दिले आदेश
अपघातातील मृत व्यक्ती या एकाच कुटुंबातील होत्या. मिनी बसमधून सर्व प्रवासी वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी निघाले होते. मात्र येथे पोहोचण्याआधीच वाटेतच त्यांच्यावर काळाने झडप घातली. चालकाच्या चुकीमुळेच हा अपघात झाल्याचे प्रवाशांचे म्हणणे असल्याचे वृत्त आजतकने दिले आहे. बसमधून 30 ते 35 प्रवासी प्रवास करत होते. रात्रीची वेळ असल्याने सगळे झोपले होते. उठले तेव्हा अपघात झाला होता. नेमकं काय घडलं हे सुरुवातीला लक्षात आलं नाही असे बसमधील प्रवासी शिवानीने सांगितले.
दरम्यान, स्त्यांवर वाहनांचा वेग भरधाव असतो. त्यामुळे वाहन नियंत्रित करणे सहजासहजी शक्य होत नाही. रस्त्यावर अपघातांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. त्यामुळे अपघात रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात अशी मागणी सातत्याने केली जात आहे. अपघातांची संख्या कमी करण्यासाठी या उपाययोजनांची गरज आहे. उपाययोजना प्रत्यक्षात अंमलात आणण्याचीही गरज आहे.
Road Accident : चालकाची डुलकी बेतली जीवावर! समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; तिघांचा मृत्यू