Download App

PM मोदींवर आक्षेपार्ह वक्तव्य करणारा युवक गजाआड; दरभंगा पोलिसांनी केली अटक

Person used abusive language against PM Modi arrested from Darbhanga Bihar : बिहारमधील दरभंगा येथे पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल अपशब्द वापरणाऱ्या व्यक्तीविरुद्ध मोठी कारवाई करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बिहार पोलिसांनी आरोपीला दरभंगा येथून अटक केली आहे. दरभंगा येथील रहिवासी रिझवी यांनी काँग्रेसच्या रॅलीत पंतप्रधान मोदींसाठी चुकीचे शब्द वापरले होते. या प्रकरणावरून राजकीय गोंधळ उडाला होता. त्यानंतर पोलिसांनी संब्ंधित व्यक्तीविरूद्ध कारवाई करत त्याला अटक केली आहे.

फिटनेसचा उत्सव साजरा करा! क्रीडा दिनी सेलिब्रिटींचं एकत्रित आवाहन

बिहार निवडणुकीच्या आधी विरोधी पक्ष ‘वोटर अधिकार यात्रा’ आयोजित करत आहेत. या दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी आणि तेजस्वी यादव यांनी अनेक ठिकाणी सभा घेतल्या आहेत. बुधवारी 27 ऑगस्ट रोजी दरभंगा येथे झालेल्या विरोधी पक्षांच्या रॅलीदरम्यान पंतप्रधान मोदी (PM Modi) आणि त्यांच्या आईबद्दल अपशब्द वापरले गेले. मात्र, यावेळी राहुल किंवा तेजस्वी व्यासपीठावर उपस्थित नव्हते. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावरही शेअर करण्यात आला आहे.

“बाळासाहेब थोरातांची दहशत मोडून काढणार”, अमोल खताळांवरील हल्ल्यानंतर मंत्री विखे संतापले

केंद्रीय गृहमंत्री अमित शहाकडून नाराजी व्यक्त

या प्रकरणाबाबत अमित शाह यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स (X) वर एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टद्वारे त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली. अमित शाह यांनी पोस्टद्वारे म्हटले आहे की, “बिहारमधील दरभंगा येथे काँग्रेस आणि राजदच्या व्यासपीठावरून माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी (PM Modi) आणि त्यांच्या दिवंगत आईबद्दल ज्या प्रकारे अपशब्द वापरले गेले हे केवळ निंदनीयच नाही तर आपल्या लोकशाहीवर कलंक आहे”.

75 व्या वर्षी रिटायरमेंट नाही! मोहन भागवत यांचे मोठे विधान, ‘स्वयंसेवक आयुष्यभर कार्यरत…’

जेपी नड्डा : राहुल गांधी, तेजस्वी यादव यांनी माफी मागावी

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी या प्रकरणाबाबत राहुल गांधी आणि तेजस्वी यादव यांच्याकडून माफीची मागणी केली आहे. त्यांनी गुरुवारी 28 ऑगस्टला म्हटले की, “काँग्रेसच्या तथाकथितन ‘वोटर अधिकार यात्रे’ दरम्यान काँग्रेस-राजदच्या व्यासपीठावरून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांना ज्या प्रकारे शिवीगाळ करण्यात आली ती अत्यंत निंदनीय आहे. अश्लीलतेच्या सर्व मर्यादा ओलांडणाऱ्या दोन राजपुत्रांनी बिहारच्या भूमीवर बिहारच्या संस्कृतीचाही अपमान केला आहे. राहुल गांधी आणि तेजस्वी यादव यांनी यासाठी माफी मागावी”.

follow us