“बाळासाहेब थोरातांची दहशत मोडून काढणार”, अमोल खताळांवरील हल्ल्यानंतर मंत्री विखे संतापले

Radhakrishna Vikhe : संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांच्यावर (Amol Khatal) एका कार्यक्रमात दरम्यान एका माथेफिरूकडून हल्ला झाला. या घटनेनंतर आता जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) हे देखील आक्रमक झाले असून त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना अनेक धक्कादायक खुलासे केले. यावेळी त्यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी असलेले माजी आमदार बाळासाहेब थोरात यांच्यावर (Balasaheb Thorat) देखील काही आरोप केले आहे.
यावेळी बोलताना मंत्री राधाकृष्ण विखे म्हणाले की मी संगमनेरमध्ये जाऊन त्या ठिकाणची प्रत्यक्ष माहिती घेणार आहे त्या ठिकाणी नेमकं काय घडलं होतं. अनेक धक्कादायक ऑडिओ क्लिप आमच्याकडे आलेल्या आहेत. थोरात यांच्याच गावचे सरपंच सांगताहेत की बाळासाहेब थोरात यांनी आम्हाला सांगितले की भाजपची लोक जिथे असेल तिथे त्यांना ठोकून काढा असे आदेश दिले आहे. बाळासाहेब थोरात यांनी एवढे वैफल्यग्रस्त होणं योग्य नाही चाळीस वर्षे तालुक्याच्या जनतेच्या जीवावर आपण सत्ता उपभोगली आहे.
जशास तसे उत्तर देऊ! आमदार अमोल खताळांवर हल्ला, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील संतापले
आता जनतेने तुम्हाला नाकारलं आहे. नवीन नेतृत्वाला संधी दिली आहे तुम्ही अशा प्रकारे दडपशाही करून दहशत निर्माण करणार असाल त्या मी कधीच सहन करणार नाही. दहशत मोडून काढली जाईल तसेच कार्यकर्त्यांना जर असा त्रास होणार असेल तर तुम्हाला देखील त्याचा त्रास भोगावच लागेल असा इशारा देखील यावेळी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी थेट बाळासाहेब थोरात यांना दिला.
संबंधित आरोपीबाबत संगमनेर बाहेर काही गुन्हे दाखल आहे अशी प्राथमिक माहिती मिळत आहे यावर बोलताना मंत्री विखे म्हणाले, गुन्हा दाखल झाला असून आरोपीला अटक झाली आहे. तो एकटाच नसून त्याच्या कॉल रेकॉर्डरवरून जी धक्कादायक माहिती आम्हाला समजली. आरोपीला कोणाचे कॉल होते मेसेज होते याची माहिती मिळते आहे. त्यामुळे हा चौकशीचा भाग असणार आहे
या प्रकरणात पोलिसांना संपूर्ण स्वातंत्र्य दिले असून अशा प्रवृत्तीच्या लोकांच्या वेळीच बंदोबस्त झाला पाहिजे. ज्यांना लोकशाही मान्य नाही त्यांना धडा शिकवण्याची खरी गरज आहे, अशा शब्दांत एक प्रकारे मंत्री राधाकृष्ण विखे यांनी थोरात यांना थेट आव्हानच दिले आहे.
मोठी बातमी! मंत्री राधाकृष्ण विखे पाटील मनोज जरांगेंचा गैरसमज दूर करणार, कुठे होणार चर्चा?