Download App

Sikkim Landslide : सिक्कीममध्ये मुसळधार पावसामुळे भूस्खलन; रस्ता वाहून गेला, लष्कराने 3500 पर्यटकांना वाचवलं…

Sikkim Landslide : सिक्कीममध्ये मुसळधार पावसामुळे भूस्खलन झालं आहे. भूस्खलनामुळे सिक्कीममधील मुख्य रस्ते बंद पडले आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी पर्यटक अडकले होते. भूस्खलनामध्ये अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी भारतीय लष्कराला पाचारण करण्यात आलं असून लष्कराने आत्तापर्यंत 3 हजार 500 पर्यटकांची सुटका करण्यात आलीय.

काल झालेल्या पावसामुळे सिक्कीममधल्या अनेक ठिकाणी दरड कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे अनेक भागांतील रस्ते बंद पडले आहेत. चुंगथांगमध्ये भागात अनेक पर्यटक अडकल्याची माहिती समोर आली. त्यानंतर लष्कराने बचावकार्यात अडकलेल्या 3 हजार 500 पर्यटकांना सुखरूप बाहेर काढलं आहे.

भारतीय लष्कराच्या बीआरओ जवानांकडून ही बचावकार्याची मोहिम राबवण्यात आली असून जवानांनी रात्रभर परिश्रम घेत पर्यटकांना सुखरुप सुरक्षितस्थळी पोहोचवलं आहे. यावेळी जवानांकडून मदतीसह नागरिकांना अन्नही पुरवलं आहे.

‘फेव्हिकॉल हा ओरिजनल असावा…’; भुजबळांचा शिंदे-फडणवीसांना खोचक टोला

भारतीय लष्कराने शनिवारी दुपारी 3 वाजेपर्यंत दोन हजार पर्यटकांची सुटका केली. त्यानंतर 1500 पर्यटकांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं. उत्तर सिक्कीममधील लाचेन आणि लाचुंगसह अनेक भागात मुसळधार पावसामुळे पर्यटक अडकले होते. जिल्हा प्रशासनाकडून अडकलेल्या पर्यटकांना बाहेर काढण्यासाठी 19 बस आणि 70 छोटी वाहने तैनात केली आहेत. आत्तापर्यंत तीन बससह दोन अन्य वाहने 123 पर्यटकांना घेऊन राज्याची राजधानी गंगटोककडे रवाना झाल्याची माहिती एनएनआय वृत्तसंस्थेने दिलीय.

Ahmednagar Fire : शहरातील आगीच्या घटनेला आमदार जगतापांनी धरले मनपा आयुक्तांना जबाबदार

सिंगताम, डिक्चू, रंगरान, मंगन आणि चुंगथांग यांना जोडणाऱ्या रस्त्याला भूस्खलनाचा मोठा फटका बसला आहे. डिक्चू ते गंगटोक मार्गे राकडुंग-टिनटेक मार्ग फक्त हलक्या वाहनांसाठी खुला आहे.

दरम्यान, बिपरजॉय चक्रीवादळाचा परिणाम देशातील इतर राज्यांत दिसून येत आहे. हवामान विभागाच्या अंदाजानूसार चक्रीवादळ बिपरजॉय पूर्व भारतात नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या प्रवासाला मदत करत असल्याने मुसळधार पाऊस बरसणार असल्याचं सांगितलं होतं. त्यानूसार गुजरात, सिक्कीम, राजस्थानमध्ये मुसळधार पाऊस बरसत आहे.

Tags

follow us