Stampede In Jagannath Rath Yatra : ओडिशातील पुरी येथील जगन्नाथ रथयात्रेदरम्यान चेंगरा-चेंगराची (Stampede In Jagannath Rath Yatra ) घटना घडलीयं. पहाटे 4 वाजताच्या सुमारास गुंडीचा मंदिरासमोर भगवान जगन्नाथाच्या नंदीघोष रथाजवळ झालेल्या या चेंगरा-चेंगरीत 3 भाविकांचा मृत्यू झाला असून 30 जण जखमी झाल्याची माहिती समोर आलीयं.
बसंत साहू, प्रेम कांती महंती, प्रभात दास अशी या चेंगरा-चेंगरीमध्ये मृत्यूमुखी पडलेल्या भाविकांची नावे असून मृत व्यक्तींची मृतदेह पुरी मेडिकल कॉलेजमध्ये ठेवण्यात आले आहेत. भगवान जगन्नाथ यांचा रथ पाहण्यासाठी मोठी गर्दी जमली होती. यादरम्यान, झालेल्या चेंगराचेंगरमध्ये लोकं पडल्याने चिरडले गेले आहेत. चेंगरा-चेंगरी झालेल्या ठिकाणी पुरेसे पोलिस आणि सुरक्षा दलाचे जवान नसल्याची माहिती समोर येत आहे.
अंतराळात सर्व काही ठीक आहे का?, अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांच्याशी पंतप्रधानांनी साधला संवाद
भगवान बलभद्र आणि देवी सुभद्रा यांची मुर्ती घेऊन येणारे रथ जात असतानाच ही घटना घडलीयं. पहाटेच्या सुमारास 4 : 30 वाजता हा रथ गुंडिचा मंदिर परिसरातून जात होता. याचवेळी काही भाविक खाली पडल्याने चेंगरा-चेंगरीची घटना घडली. या घटनेत तीन जणांचा मृत्यू झाला असून हे तीन्ही लोकं ओडिशातील रहिवासी आहेत.
आधी नोकरीचे आमिष, मग बलात्कार केला; पद्मश्री कार्तिक महाराजांवर महिलेचा गंभीर आरोप
रथयात्रेच्यावेळी भगवान जगन्नाथ, भगवान बलभद्र, देवी शुभद्रा यांच्या मुर्तींचे तीन रथ भाविकांची गर्दी ओढत असते. या पवित्र रथांना गुंडीचा मंदिरात ही गर्दी ओढत घेऊन जात असते. जगन्नाथ मंदिरातून परतण्याआधी तिन्ही रथ एका आठवड्यासाठी याच ठिकाणी ठेवले जातात.