क्रेडाईची राज्यस्तरीय बैठक: बांधकाम व्यावसायिकांच्या अडचणींवर विचारमंथन

CREDAI second general meeting in Ahilyanagar : बांधकाम क्षेत्रात देशपातळीवरील प्रतिष्ठित असलेल्या क्रेडाई संघटनेची (CREDAI) राज्य शाखेची दुसरी जनरल बॉडी मिटींग अहिल्यानगर (Ahilyanagar) शहरामध्ये शनिवारी पार पडली. या बैठकीत बांधकाम व्यावसायिकांना येणाऱ्या अडचणींवर विचारमंथन करण्यात आले.
क्रेडाई महाराष्ट्रचे अध्यक्ष प्रफुल्ल तावरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीला राज्यभरातील 60 शहरांतील चारशेहून अधिक बांधकाम व्यावसायिक उपस्थित होते. घरे बांधताना येणाऱ्या अडचणी, जमिनीची मोजणी, जीएसटी, रेरा, बांधकाम परवानग्या या विषयांवर चर्चा झाली. या अडचणींतून मार्ग काढण्याबाबत चर्चा झाली.
क्रेडाईचे राष्ट्रीय व्हाईस प्रेसिंडेट रणजीत नाईकनवरे म्हणाले, बांधकाम व्यावसायिकांना परवानग्या मिळताना अनेक अडचणी येतात. त्यातून गुंतवणूकदार व ग्राहकांना तोटा होतो. परंतु अहिल्यानगर शहरात या अडचणी येत नाहीत. त्याचे श्रेय येथील शासनकर्ते व क्रेडाई संघटनेला जाते.
आमदार संग्राम जगताप म्हणाले, महाराष्ट्रभरातून बांधकाम व्यावसायिक अहिल्यानगरमध्ये आले होते. त्यांनी बदलते व विकसित अहिल्यानगर शहर पाहिले आहे. शहरात उंच इमारती उभ्या राहिल्या पाहिले. शहरातील नागरिकांना घरांच्या चांगल्या सुविधा मिळाल्या पाहिजे. त्यासाठी क्रेडाई संघटनेला नेहमीच माझी मदत राहिल.
या बैठकीबाबत उद्योजक नरेंद्र फिरोदिया म्हणाले, अहिल्यानगर शहरात रिअल इस्टेटचा विस्तार होत आहे. या बैठकीमुळे अहिल्यानगर शहराचे नावही मोठे झाले आहे. आपल्या शहरात बांधकाम व्यावसायिकांना चांगल्या संधी आहेत. त्यातून ग्राहकांचा फायदा होईल.
अनेक अडचणींवर बैठकीत चर्चा-आशिष पोखरणा
रेरा, जमीन मोजणीचा विषय, फायनान्समधील अडचणींबाबत बैठकीत चर्चा झाली आहे. हे विषय मंत्रालयास्तरावर मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले जाणार ्सल्याचे क्रेडाई महाराष्ट्राचे सेक्रेटरी आशिष पोखरणा यांनी म्हटले आहे.
या बैठकीला कार्यक्रमाला भरघोस असा प्रतिसाद मिळाला, यावेळी आयोजित एक्झिबिशनमध्ये विविध कंपन्यांनी सहभाग नोंदवला.