Download App

कर्ज घ्या कर्ज! मुद्रा योजनेत मिळणार 20 लाखांपर्यंत कर्ज; कर्ज मर्यादेत दुप्पट वाढ..

पंतप्रधान मुद्रा योजनेसंदर्भात मोठी घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी या बजेटमध्ये करण्यात आली.

Union Budget 2024 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी आज संसदेत बजेट (Budget 2024) सादर केलं. भाजपाच्या नेतृत्वातील एनडीए सरकारचं (NDA Government) हे पहिलंच बजेट होतं. त्यामुळे देशातील जनतेबरोबरच सरकारमधील घटक पक्षांचंही बजेटकडे (Bihar News) लक्ष होतं. सितारमण यांनी युवक, महिला, शेतकरी आणि बेरोजगार युवकांसाठी अनेक मोठ्या घोषणा केल्या. पंतप्रधान मुद्रा योजनेसंदर्भात मोठी (PM Mudra Yojana) घोषणा या बजेटमध्ये करण्यात आली. पीएम मुद्रा योजनेत आता वीस लाख रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध होणार आहे. याआधी ही रक्कम दहा लाख रुपये होती. या घोषणेमुळे स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची इच्छा असणाऱ्या बेरोजगारांना मोठा फायदा मिळणार आहे.

Budget : संध्याकाळचं बजेट सकाळी; एकाच निर्णयानं ब्रिटीशकालीन परंपरा मोडीत

काय आहे योजना?

प्रधानमंत्री मु्द्रा योजना केंद्र सरकारकडून राबवण्यात येते. या अंतर्गत लोकांना नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी कोणत्याही हमीशिवाय कर्ज उपलब्ध करून दिले जाते. या योजनेत सध्या दहा लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळत होते. आता ही मर्यादा वाढवून वीस लाख रुपये करण्यात येईल अशी घोषणा सितारमण यांनी केली.

कधी सुरू झाली योजना?

केंद्र सरकारने ही योजना सन 2015 मध्ये सुरू केली होती. ज्या लोकांना भांडवला अभावी नवा व्यवसाय सुरू करता येत नाही अशा लोकांना कर्ज उपलब्ध करुन देणे हा महत्वाचा उद्देश ही योजना सुरू करण्यामागे होता.

Union Budget 2024 LIVE : मोबाईल, कॅन्सरची औषधे, सोने चांदी स्वस्त होणार

या योजनेंतर्गत लाभार्थ्याला एक कार्ड दिले जाते. या कार्डला मुद्रा कार्ड म्हणतात. या कार्डचा उपयोग डेबिट कार्डप्रमाणे करता येतो. या कार्डच्या मदतीने लाभार्थी त्याच्या व्यवसायाशी संबंधित खर्चासाठी पैसे काढू शकतो.

follow us