Instant Loan App : ‘इन्स्टंट लोन’ची भानगड, ट्रॅपमधून वाचण्यासाठी काय काळजी घ्यावी?

Instant Loan App : ‘इन्स्टंट लोन’ची भानगड, ट्रॅपमधून वाचण्यासाठी काय काळजी घ्यावी?

Instant Loan App : तुम्हाला देखील इन्स्टंट लोन अॅपच्या ( Instant Loan App) जाहिरातींचे मॅसेज येतात का? तुम्हाही अशाप्रकारचं कर्ज घेऊ इच्छित आहात का? तर सावधान कारण हे झटपट कर्जाचं आमिष तुम्हाला थेट जीनव संपविण्यापर्यंत घेऊन जाऊ शकता होय हे खरंय काय आहे या इन्स्टंट लोन अॅपच्या फसवणुका ट्रॅप, यासाठी काय काळजी घ्यावी जाणून घ्या सविस्तर…

नेमका प्रकार काय आहे?

इन्स्टंट लोन अॅपवरून कर्ज घेतलं त्यानंतर त्यावरून एजंटकडून कर्जवसुलीसाठी तगादा सुरू झाला. तो इतका खालच्या पातळीचा होता की, लोकांना त्यांचे नग्न फोटो पाठवून धमकावलं गेलं आणि या अश्लील धमक्यांना घाबरून आतापर्यंत अनेकांनी आपलं जीवन संपवलं. अशा एक नाही तर तब्बल 60 घटना आपल्या देशात समोर आल्या आहेत. तर इतरही देशात हे प्रकार समोर येत आहेत. दरम्यान या अॅप्सचं चीनी कनेक्शन देखील समोर आलं आहे.

कशी करतात फसवणुक?

यांचं बिझनेस मॉ़डेल अगदी साधं आहे. पण अगदी क्रूर पद्धतीने ते चालवलं जातं. अगोदर तुम्हाला काही मिनिटांत कोणत्याही अटी शर्थी आणि कागदपत्रांविना झटपट कर्जाचं अमिश दाखवलं जात. त्यानंतर एकदा तुम्ही हे इन्स्टंट लोन अॅप डाऊनलोड केली की, तुमच्या फोनमधील तुमचे काँटॅक्ट्स, फोटो आणि ओळखपत्र या सर्व गोष्टी अॅपद्वारे ताब्यात घेतल्या जातात. त्यानंतर जेव्हा ग्राहक पैसे वेळेवर परत करत नाहीत, त्या वेळी किंवा काही वेळा तर वेळेवर व्याजासहित पैसे परत केलेले असूनही तुमची माहिती कॉल सेंटरला पुरवली जाते. आणि इथुन तुमचा मानसिक छळ सुरू होतो. अश्लील मॅसेज, अश्लील शीवीगाळ, मॉर्फ केलेले नग्न फोटो तुमच्या कॉंन्टॅक्ट लिस्टमधील लोकांना पाठवण्याच्या धमक्या दिल्या जातात.

शिंदे-गटाला दिलासा! ठाकरे गटाची याचिका कोर्टाने फेटाळली, कोर्ट म्हणाले, ‘ठोस पुरावेच नाहीत…’

हे कॉल सेंटर म्हणजे येथेल तरुण एजंट्सना अशा प्रकारे ग्राहकांकडून कर्ज वसुली कऱण्याचं प्रशिक्षण दिलेलं असतं. त्यासाठी ते कोणत्याही थराला जातात. हे तरूण लॅपटॉप, फोन अशी अत्याधुनिक आयुधं वापरून ग्राहकाला धमकावण्याचं काम करतात. त्यांचा मानसिक छळ करतात.

भारत-पाकिस्तान पहिल्यांदा कधी भिडले ! पाहा रंजक माहिती

ही प्रकरणं भारतातच नव्हे तर जगभरात घडत आहेत तर आतापर्यंत एकट्या भारतात 60 हून अधिक लोकांनी लोन अॅपच्या वसुलीच्या नावाने होणाऱ्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्या आहेत. तेलंगणा आणि आंध्र प्रदेशातच यातल्या 50 टक्क्यांहून अधिक आत्महत्या झाल्या आहेत. या ऑनलाइन कर्जाच्या विळख्यात सापडलेले आणि नंतर छळाला बळी पडलेले बहुतेक जण इतके वैषम्यग्रस्त झाले की, ते या गैरव्यवहाराबद्दल बोलण्याचीही त्यांना लाज वाटते, भीती वाटते. त्यामुळे अनेक प्रकरणात गुन्हेगारांची नावं समोर येतच नाहीत. खरे दोषी दिसतच नाहीत.

फसवणुकीपासून कसं वाचाल?

या अॅपच्या फसवणुकीपासून वाचण्यासाठी अगोदर तर या अॅपवरून कर्ज घेणे टाळा. अगदीच आवश्यक असेल तरच अशा लोन घ्या मात्र ते लोन घेताना पुर्ण माहिती घ्या, घाईघाईत कोणतही पाऊल उचलू नका. अशा प्रकारच्या अॅपवरून लोन घेताना त्याचे रिव्ह्यू आणि रेटींग तपासा, समजा सर्व काळजी घेऊनही तुमची अशी फसवणूक झाली तर घाबरून जाण्याचं कारण नाही. आरबीआयने यासाठी सचेत नावाचं पोर्टल काढलं आहे. ज्यावर अशा प्रकारे इन्स्टंट लोन अॅपवरून तुमची फसवणूक झाल्यास तुम्ही तक्रार करू शकता. त्यासाठी Sachet (rbi.org.in) या पोर्टलला भेट द्या. तसेच गरज पडल्यास तात्काळ पोलीसांमध्ये तक्रार नोंदवा. आणि अशा प्रकारे होणाऱ्या फसवणुकी पासून स्वतःची आपल्या नातलगांची आणि आसपासच्या सर्वांची काळजी घ्या…

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube