भारत-पाकिस्तान पहिल्यांदा कधी भिडले ! पाहा रंजक माहिती
World Cup 2023: 2023 च्या वर्ल्ड कपमध्ये (World Cup 2023) भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यात 12 वा सामना होणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना होणार आहे. टीम इंडिया आणि पाकिस्तानने सुरुवातीचे दोन्ही सामने जिंकले आहेत. आता हा सामना रंजक असेल. भारत आणि पाकिस्तानच्या क्रिकेट इतिहासावर नजर टाकली तर दोन्ही संघांमध्ये पहिला सामना 1952 मध्ये झाला होता. हा कसोटी सामना होता. पहिला एकदिवसीय सामना 1978 मध्ये क्वेटा येथे खेळला गेला होता. भारताने पहिली कसोटी आणि वनडे दोन्ही जिंकले.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील पहिली कसोटी
लाला अमरनाथ यांच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने पाकिस्तानविरुद्ध पहिली कसोटी खेळली. दिल्लीत झालेल्या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना 372 धावा केल्या होत्या. यादरम्यान विजय हजारेने 76 धावा केल्या होत्या. विजय मांजरेकरने 23 धावांचे योगदान दिले होते. हेमू अधिकारीने नाबाद 81 धावा केल्या होत्या. भारताने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानचा संघ पहिल्या डावात 150 आणि दुसऱ्या डावात 152 धावा करत सर्वबाद झाला. अब्दुल कारदार यांच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानने हा सामना खेळला.
उद्या भारत-पाक हायव्होल्टेज सामना, जाणून घ्या आतापर्यंतची हिस्ट्री
भारताने पहिला एकदिवसीय सामना जिंकला
पाकिस्तानविरुद्धच्या कसोटीनंतर भारताने पहिला एकदिवसीय सामनाही जिंकला. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना क्वेटा येथे 1978 मध्ये खेळला गेला होता. प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने 7 गडी गमावून 170 धावा केल्या. यादरम्यान मोहिंदर अमरनाथने 51 धावांची शानदार खेळी केली. दिलीप वेंगसरकरने 34 धावा केल्या. सुरिंदर अमरनाथने 37 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात पाकिस्तानचा संघ केवळ 166 धावा करू शकला. पाकिस्तानकडून माजिद खानने सर्वाधिक 50 धावा केल्या.
आत्तापर्यंत भारत आणि पाकिस्तानमध्ये एकूण 134 वनडे सामने खेळले गेले आहेत. या कालावधीत टीम इंडियाने 56 सामने जिंकले आहेत. तर 73 सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागला आहे. पण एकदिवसीय विश्वचषकात भारतीय संघाने पाकिस्तानविरुद्ध आपला दबदबा कायम ठेवला आहे.
World cup 2023 : भारत-पाक सामन्यापूर्वी शुभमन गिल ठरला ‘प्लेअर ऑफ द मंथ’
एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेतील दोन्ही संघांचा पहिला सामना 1992 मध्ये ऑस्ट्रेलियातील सिडनी येथे झाला होता. त्यानंतर दोन्ही संघ 7 वेळा आमनेसामने आले आहेत आणि प्रत्येक वेळी टीम इंडियाने विजय मिळवला आहे. या दोघांमधला एकदिवसीय विश्वचषकातील 8 वा सामना शनिवारी, 14 ऑक्टोबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे.