उद्या भारत-पाक हायव्होल्टेज सामना, जाणून घ्या आतापर्यंतची हिस्ट्री

उद्या भारत-पाक हायव्होल्टेज सामना, जाणून घ्या आतापर्यंतची हिस्ट्री

World Cup 2023 : एकदिवसीय विश्वचषकात भारतीय संघाने पाकिस्तानविरुद्ध (IND vs PAK) आपला दबदबा कायम ठेवला आहे. एकदिवसीय विश्वचषक (World Cup 2023) स्पर्धेतील दोन्ही संघांचा पहिला सामना 1992 मध्ये ऑस्ट्रेलियातील सिडनी येथे झाला होता. त्यानंतर दोन्ही संघ 7 वेळा आमनेसामने आले आहेत आणि प्रत्येक वेळी टीम इंडियाने विजय मिळवला आहे. या दोघांमधला एकदिवसीय विश्वचषकातील 8 वा सामना शनिवारी, 14 ऑक्टोबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. त्याआधी भारताने पाकिस्तानला कधी पराभूत केले ते जाणून घेऊया.

1992- सिडनी
एकदिवसीय विश्वचषकात भारत आणि पाकिस्तानचे संघ पहिल्यांदा आमनेसामने आले होते ते 1992 च्या विश्वचषकात सिडनीत. 4 मार्च 1992 रोजी झालेल्या सामन्यात भारताने 43 धावांनी विजय मिळवला होता.

1996- बंगलोर
एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यातील दुसरा सामना 1996 च्या स्पर्धेत बंगळुरू येथे झाला. 9 मार्च रोजी झालेल्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा 39 धावांनी पराभव केला होता.

1999- मँचेस्टर
एकदिवसीय विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तिसरा सामना 1999 च्या विश्वचषकात 8 जून रोजी झाला होता. या सामन्यात भारताने पाकिस्तानचा 47 धावांनी पराभव केला.

…तर आम्ही पुन्हा सरन्यायाधीशांकडे जाऊ; नार्वेकरांना आदित्य ठाकरेंचा इशारा!

2003- सेंच्युरियन
2003 च्या एकदिवसीय विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान सेंच्युरियनमध्ये भिडले होते. या सामन्यात भारताने पाकिस्तानचा 29 धावांनी पराभव केला.

2011- मोहाली
2011 मध्ये भारतीय संघ दुसऱ्यांदा एकदिवसीय विश्वचषकाचा चॅम्पियन बनला होता. या विश्वचषकात मोहालीमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना झाला, ज्यामध्ये टीम इंडियाने 29 धावांनी विजय मिळवला.

2015- अॅडलेड
एकदिवसीय विश्वचषकात भारत आणि पाकिस्तानची सहावी लढत अॅडलेडमध्ये झाली. या सामन्यात भारताने पाकिस्तानचा 76 धावांनी पराभव केला.

World cup 2023 : भारत-पाक सामन्यापूर्वी शुभमन गिल ठरला ‘प्लेअर ऑफ द मंथ’

2019- मँटेस्टर
एकदिवसीय विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शेवटचा आणि सातवा सामना मँचेस्टरमध्ये झाला. या सामन्यात टीम इंडियाने डकवर्थ लुईस नियमानुसार पाकिस्तानचा 89 धावांनी पराभव केला. एकदिवसीय विश्वचषकात पाकिस्तानविरुद्ध भारताचा हा सलग 7 वा विजय ठरला.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube