Union Budget: केंद्रीय अर्थसंकल्पानंतर शेअर बाजार गडगडला; सेन्सेक्स 1000 अंकांनी घसरला
Stock Market : आज एनडीए सरकारचा तिसऱ्यांदा सत्तेत आल्यानंतर पहिला अर्थसंकल्प जाहीर करण्यात आला. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी संसदेत अर्थसंकल्प मांडला आहे. (Stock Market) दरम्यान, अर्थसंकल्प सादर होण्याआधी बाजारात सुरुवात वाढीने झाली. मात्र, काही वेळातच घसरण व्हायला लागली. यामध्ये सेनसेक्स 1000 अंकांनी घसरला आहे. तर निप्टीमध्ये 382 अंकांची घसरण झाली आहे.
सुरुवातीला वाढ Budget 2024 : नोकरदारांना दिलासा, 3 लाखांपर्यंत उत्पन्न करमुक्त; कररचनेत मोठा बदल
आज सकाळी सव्वा दहा वाजता सेन्सेक्स 145 अंकांनी घसरला तर निफ्टीतही 58 अंकांची घसरण झाली. सव्वा दहा वाजता सेन्सेक्स 80355 अंकावर तर निफ्टी 24451 अंकांवर होता. बाजार उघडताच सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही 0.3 टक्क्यांनी वधारले होते. मात्र, तासाभरात अंकात मोठी घसरण दिसून आली. अर्थसंकल्पाचा परिणाम शेअर बाजारावरही होण्याची शक्यता आहे. सोमवारी बाजार बंद होताना सेन्सेक्स 80502 अंकावर होता. तर मंगळवारी सुरुवातीला उसळी घेत 80724 अंकापर्यंत पोहोचला होता.
घसरण बिहारचंही गुडलक! रस्ते अन् पायाभूत सुविधांसाठी निधीचा वर्षाव; अर्थमंत्र्यांची घोषणा
आज सेन्सेक्स 80355 पर्यंत खाली आला. केंद्र सरकार अर्थसंकल्पात काय घोषणा करणार याकडं सर्वांचं लक्ष लागलेलं होतं. अर्थमंत्री सीतारमण यांनी कोणकोणत्या घटकांसाठी काय तरतूद केली याचाही विचार शेअर मार्केटमध्ये होतो. शेतकरी, महिला, रोजगार यांच्यासाठी अनेक घोषणा झालेल्या आहेत. उद्योग, सेवा, आयटी या क्षेत्रासाठी केंद्र सरकारने तरतुदी केल्या आहेत. दरम्यान यानुसार शेअर बाजारात चढउतार होत आहेत.
शेअर बाजारात काय झालं? आंध्र प्रदेशला स्पेशल पॅकेजची घोषणा; चंद्रबाबू नायडूंना दिलेला शब्द PM मोदींनी पाळला
बाजारात लार्जकॅप, मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्ये संमिश्र व्यवहार होताना दिसतायत. अर्थसंकल्प सादर होण्याआधी सोमवारी रिलायन्स इंडस्ट्रीज, कोटक महिंद्रा बँकेच्या शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणावर विक्री झाली. त्यामुळे बाजार घसरणीसह बंद झाला. शुक्रवारीसुद्धा बाजारात घसरण झाली होती. सलग दुसऱ्या दिवशी बाजार घसरणीसह बंद झाला.