Budget 2024 : नोकरदारांना दिलासा, 3 लाखांपर्यंत उत्पन्न करमुक्त; कररचनेत मोठा बदल

Budget 2024 : नोकरदारांना दिलासा, 3 लाखांपर्यंत उत्पन्न करमुक्त; कररचनेत मोठा बदल

Union Budget 2024 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी आज संसदेत बजेट (Budget 2024) सादर केलं. भाजपाच्या नेतृत्वातील एनडीए सरकारचं (NDA Government) हे पहिलंच बजेट होतं. त्यामुळे देशातील जनतेबरोबरच सरकारमधील घटक पक्षांचंही बजेटकडे (Bihar News) लक्ष होतं. या बजेटमध्ये अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्या. तसेच कर रचनेत मोठा बदल करून सर्वसामान्यांना दिलासा दिला आहे. सितारमण यांनी बजेटमध्ये पगारदार लोकांसाठी मोठी घोषणा केली आहे. मध्यम वर्गाकडून कर रचनेत बदल करण्याची मागणी सातत्याने केली जात होती. सरकारने या मागणीची दखल घेत कररचनेत मोठा बदल केला आहे.

शेतीचं बजेट! दीड लाख कोटींची तरतूद अन् शेतकऱ्यांसाठी डिजीटल प्लॅटफॉर्म; बजेटमध्ये घोषणा

स्टँडर्ड डिडक्शनची मर्यादा 50 हजार रुपयांवरून 75 हजार रुपये करण्यात आली आहे. या व्यतिरिक्त अर्थमंत्र्‍यांनी न्यू टॅक्स रिजीमच्या टॅक्स स्लॅबमध्ये मोठा बदल करण्यात आल्याची माहिती दिली. या नव्या बदलानुसार तीन लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही कर द्यावा लागणार नाही. तीन ते सात लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर पाच टक्के कर द्यावा लागेल.

सात लाख ते दहा लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर दहा टक्के कर द्यावा लागेल. दहा ते बारा लाख रुपयांच्या उत्पन्नसाठी 15 टक्के कर द्यावा लागेल. 12 लाख ते 15 लाख रुपये वार्षिक उत्पन्न असणाऱ्या नागरिकांना 20 टक्के आयकर भरावा लागणार आहे. तसेच ज्या लोकांचे उत्पन्न 15 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे त्यांना 30 टक्के कर भरावा लागणार आहे.

एनपीएस बाबतही मोठी घोषणा

सरकारने एनपीएस योजनेतील अंशदान वजावटीची मर्यादा 10 टक्क्यांवरून वाढवून 14 टक्के करण्यात आली आहे. सरकारने पेन्शनर लोकांसाठी फॅमिली पेन्शनवर कर कपात 15 हजार रुपयांवरुन 25 हजार रुपये करण्याचे प्रस्तावित केले आहे.

बिहारचंही गुडलक! रस्ते अन् पायाभूत सुविधांसाठी निधीचा वर्षाव; अर्थमंत्र्यांची घोषणा

नोकरदारांसाठी मोठ्या घोषणा

ईपीएफओ अंतर्गत पहिल्यांदा नोंदणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या एक महिन्याच्या पगाराच्या पंधरा हजार रुपयांपर्यंत थेट लाभ तीन हप्त्यात जारी केला जाईल. कर्मचाऱ्याच्या नोकरीच्या पहिल्या चार वर्षात ईपीएफओ योगदानांतर्गत कंपनी आणि कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देण्यात येईल असे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

स्टँडर्ड डिडक्शन वाढीचा फायदा काय ?

स्टँटर्ड डिडक्शनमध्ये वाढ झाल्याने नोकरी करणाऱ्या नोकरदारांना आणि पेन्शनर लोकांना कर बचतीत मदत मिळणार आहे. मागील पाच वर्षात पहिल्यांदाच स्टँडर्ड डिडक्शन वाढवण्यात आला आहे. याआधी 2019 च्या अंतरिम बजेटमध्ये स्टँडर्ड डिडक्शन 50 हजार रुपये करण्यात आला होता. जुन्या टॅक्स रिजीममध्ये सध्या 50 हजार रुपये स्टँडर्ड डिडक्शन आहे. याचा फायदा पगारदार आणि पेन्शनर लोकांना मिळतो.

कररचनेत असा होणार बदल

0-3 लाखांच्या उत्पनावर शून्य टक्के टॅक्स
3 ते 7 लाखांवर 5 टक्के टॅक्स
7 ते 10 लाखांवर 10 टक्के टॅक्स
10-12 लाखांच्या उत्पानावर 15 टक्के टॅक्स
12-15 लाखांच्या उत्पानावर 20 टक्के टॅक्स
15 लाखांपेक्षा अधिक उत्पानावर 30 टक्के टॅक्स

follow us
  • fb
  • instagram
  • youtube