Download App

Madarsa Board : योगी आदित्यनाथ यांच्या रडारवर मदरासे! शंभर कोटी विदेशातून आले ? चौकशीसाठी एसआयटी

  • Written By: Last Updated:

UP Madrass News: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांच्या रडारवर मदरासे आले आहेत. या मदरासांना विदेशातून आर्थिक मदत येत असल्याचा संशय सरकारला आहे. त्यामुळे 80 मदरासांना मिळत असलेल्या देणगीची चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक (Special Investigation Team) ची स्थापना करण्यात आली आहे. ही एसआयटी राज्यातील 80 मदराशांची (Madarsa Board) दोन वर्षांतील आर्थिक व्यवहारांची चौकशी करणार आहे. या मदराशांना दोन वर्षांत वेगवेगळ्या देशातून शंभर कोटी रुपयांची देणगी मिळाली असल्याचा संशय सरकारला आहे.

Telangana : आधी पती, नंतर भाऊ गमावला! नक्षलवादी ते मंत्रिपदाची शपथ; सीताक्कांचा प्रवास

एसआयटीच्या पथकात तीन सदस्य असणार आहेत. अतिरिक्त पोलिस महासंचालक मोहन अग्रवाल हे एसआयटीचे प्रमुख आहेत. उत्तर प्रदेशमध्ये 24 हजार मदरासे आहेत. त्यातील 16 हजार 500 मदरासे हे यूपी मदरसा शिक्षा बोर्डकडे नोंदणीकृत आहे. या मदराशांकडे विदेशी फंडातून आलेला पैसा कुठे खर्च केला आहे. हे पैसे इतर ठिकाणी खर्च केले आहेत का ? याबाबत चौकशी केली जाणार आहे. मदरासांची आर्थिक चौकशी करण्यासाठी सरकारकडून अद्याप वेळ निश्चित केलेली नसल्याची माहिती एसआयटीचे प्रमुख मोहन अग्रवाल यांनी दिली आहे.

Pravin Darekar: अभिनेता प्रसाद खांडेकरसाठी दरेकर लढले; फडणवीसांकडून थेट कारवाईचा इशारा

परंतु एसआयटी काही चौकशी सुरू केली आहे. राज्यातील नोंदणी असलेल्या मदरासांची माहिती एसआयटीची अधिकारी मिळवत आहेत. परंतु यापूर्वी योगी आदित्यनाथ यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना बेकायदेशीर मदरासांची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. दोन महिने सर्व्हेक्षण झाल्यानंतर उत्तर प्रदेशमध्ये 8,449 मदरासे बेकायदेशीर असल्याचे उघडकीस आले होते. या मदरासांना शिक्षण बोर्डाची मान्यता नव्हती.

नेपाळ बॉर्डरवर वाढली संख्या

उत्तर प्रदेशला लागून नेपाळ आहे. या सीमेजवळील लखीमपूर खिरी, पीलीभत, श्रावस्ती, सिध्दार्थनगर आणि बहराइच या भागात एक हजारहून अधिक बेकायदेशीर मदराशे आहेत. गेल्या काही दिवसांपासून उत्तर प्रदेशमध्ये मदरासांची संख्या वेगाने वाढली आहेत. या मदरासांना विदेशातून फंडिग येत असल्याचे सरकारला वाटत आहे. त्यानंतर या मदरासांच्या चौकशीसाठी एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे.

Tags

follow us