Amravati Loksabha Election : अमरावती लोकसभा निवडणुकीत (Amravati Loksabha) मोठी घडामोड समोर आली आहे. महायुतीचे उमेदवार नवनीत राणा (Navneet Rana) यांच्याविरोधात प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. यावर बोलताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) थेट बोलले आहेत. बच्चू कडू यांचा भाजपशी थेट संबंध नाही त्यांची युती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी असून एकनाथ शिंदेंच हा तिढा सोडवणार असल्याचं चंद्रशेखर बावनकुळेंनी स्पष्ट केलं आहे.
तानाजी सावंत सहा हजार कोटींचे लाभार्थी, निवडणूक फंडासाठी कंपन्यांवर मेहरबानी : रोहित पवारांचे आरोप
बावनकुळे म्हणाले, बच्चू कडू यांचा वेगळा पक्ष आहे. त्यांची शिवसेना एकनाथ शिंदे गटासोबत युती आहे. त्यामुळे मुख्यमंत्री स्वत: अमरावतीत निर्माण झालेला तिढा सोडवतील. पण, तरीही बच्चू कडू यांची नाराजी दूर झाली नाही, तर मतदार जे ठरवतील ते होईल. शिवसेना शिंदे गटाचे नेते आनंदराव अडसूळ यांचा योग्य तो सन्मान राखण्याचा केंद्रीय आणि राज्य नेतृत्वाचा प्रयत्न आहे. त्यांचीही नाराजी दूर केली जाणार असल्याचंही बावनकुळे म्हणाले आहेत.
एअर इंडिया एअरपोर्ट सर्व्हिसमध्ये बंपर भरती, महिन्याला मिळणार 45 हजार रुपये पगार
दरम्यान, नवनीत राणा यांनी घरात घूसून मारण्याची भाषा केली होती, आम्ही गुवाहाटीला खोके घेऊन गेलो असं ते म्हणाले होते. सरकार म्हणून फडणवीस फोन करतात पण अमरावतीच्या तिकीटाच्या वेळी फोन करीत नाही. आम्ही आमची भूमिका भाजपसमोर मांडली होती, मात्र भाजपकडून राणा यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. नवनीत राणा यांना मिळालेल्या उमेदवारीचा आम्ही ठामपणे विरोध करणार असून एकतर उमेदवार उभा करु नाहीतर या वेळेचा निकाल आम्ही नक्कीच देणार असल्याचं बच्चू कडू यांनी इशारा दिला.