Download App

भाजपकडून विधान परिषदेसाठी तीन उमेदवार जाहीर, कोकण पदवीधरमध्ये तिरंगी लढत

कोकण पदवीधर, मुंबई पदवीधर, मुंबई शिक्षक आणि नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी यंदा निवडणूक होत आहे. त्यासाठी भाजपने उमेदवार जाहीर केले.

BJP Candidate List : लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha elections)रणधुमाळी नुकतीच संपली असतांना आता राज्यातील विधान परिषदेच्या (Legislative Council Elections) चार जागांसाठी निवडणुका जाहीर झाल्या. कोकण पदवीधर, मुंबई पदवीधर, मुंबई शिक्षक आणि नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी निवडणूक होत असून, या निवडणुकीसाठी भाजपने आपले उमेदवार जाहीर केले.

Lok Sabha Election 2024 2024; सर्वात जलद निकाल, पाहा फक्त लेट्सअप मराठीवर 

एएनआयने या विधानपरिषद उमेदवारांची यादी ट्वीटरवर शेअर केली आहे. त्यात भाजपने कोकण पदवीधर मतदारसंघात भाजपने विद्यमान आमदार निरंजन डावखरे यांना उमेदवारी दिली आहे. मुंबई पदवीधर मतदारसंघातून किरण शेलार तर मुंबई शिक्षक मतदारसंघातून शिवनाथ दराडे यांना भाजपने उमेदवारी जाहीर केली आहे. या विधान परिषदेच्या जागांसाठी 26 जून रोजी मतदान होणार आहे.

नव्या वादाची ठिणगी! ‘या’ देशाच्या नागरिकांना मालदीवमध्ये नो एन्ट्री; कारण काय? 

मनसेने यंदा लोकसभा निवडणुकीत एनडीएला बिनशर्त पाठिंबा दिला होता. त्यांनी लोकसभा निवडणूक एकत्र लढवली तरी विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुतीमधील घटक पक्षांमध्ये एकमद झालेलं दिसत नाही. लोकसभा निवडणुकीत भाजपला बिनशर्त पाठिंबा देणाऱ्या राज ठाकरेंनी कोकण पदवीधर मतदारसंघातून मनसेकडून अभिजित पानसेंनी उमेदवारी दिली. तर आता भाजपने कोकण मतदारसंघातून कोकण पदवीधर मतदारसंघात निरजंन डावखरेंना संधी दिली. त्यामुळं या मतदारसंघात मनसे विरुध्द भाजप अशी रंगतदार लढत होण्याची शक्यता आहे.

शिंदेचा उमदेवारही कोकणातून लढणार
कोकण पदवीधर मतदारसंघात भाजप विरुध्द मनसे अशी लढत होत असतांनाच शिवसेनेच्या शिंदे गटानेही या निवडणुकीत उडी घेतली आहे. शिवसेनेचे संजय मोरेंनी कोकण पदवीधर मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला.  त्यामुळं महायुतीच्या वज्रमूठ आता सैल झाल्याचं दिससं.

मुंबई पदवीधर मतदारसंघातून भापजने किरण शेलारांना संधी दिली. शेलारांचा सामना ठाकरे गटाचे अनिल परब यांच्याशी होणार आहे.

follow us